जिल्हाधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे साफसफाई
By Admin | Updated: September 12, 2014 00:24 IST2014-09-11T23:59:47+5:302014-09-12T00:24:19+5:30
जालना : शहरातील विविध भागात एकाच दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या रेट्यामुळे नगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे साफसफाई
जालना : शहरातील विविध भागात एकाच दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या रेट्यामुळे नगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. गुरूवारी जुना जालना विभाग २ मध्ये साफसफाई करण्यात आली.
जुना जालना भागात बाजार चौकी, मारोती मंदिर, मणियार गल्ली, शास्त्री मोहल्ला परिसर, मुजाहिद चौक ते सलीमभाई पगडी यांचे घर, दु:खीनगर या भागात ४९ कर्मचाऱ्यांनी सफाई केली. शाकेरनगर, अल्केश कॉम्प्लेक्स, बरवार गल्ली, फंक्शन हॉल या भागात २९ तर शेरसवारनगर, मिल्लतनगर या भागात २७ कर्मचाऱ्यांनी सफाई केली. टट्टूपूरा, मोरंडी मोहल्ला, लोखंडे गल्ली, मोरंडी मोहल्ला या भागात ४८ तर बागवान मशीद, मरकज मशीद, कुरैशी मोहल्ला, हकीम मोहल्ला, कैकाडी मोहल्ला या भागात ४७ कर्मचाऱ्यांनी सफाई केली.
देहेडकरवाडी, शिशटेकडी या भागात ३७ कर्मचाऱ्यांनी सफाई केली. या मोहिमेमध्ये १९ जवान, ११ वाहनचालक, १०९ पुरूष कामगार, ९८ स्त्री कामगार, ३३ खाजगी कामगार, नगरपरिषदेचे ट्रॅक्टर, घंटागाडी, कॅम्पॅक्टर, मिनीलोडर, जेसीबी अशी वाहने होती.
जुना जालन्यात एकाच दिवशी ५० टन कचरा उचलून तो सारवाडी रोडवरील डम्पिंगग्राऊंड येथे नेऊन टाकण्यात आल्याची माहिती नगर पालिकेच्या सूत्रांनी दिली.
जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मनोहरे यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी मनोहरे, सभापती नंदकिशोर जांगडे यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
गुरुवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये स्वच्छता विभागप्रमुख डी.टी. पाटील, पंडित पवार, संजय खर्डेकर, राजू मोरे, कारभारी तायडे, अशोक लोंढे, शामसन कसबे आदींचा सहभाग होता. ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
या मोहिमेस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. सदरील मोहीम यापुढेही अशाच प्रकारे राबवून जालना शहर स्वच्छ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.