२ कोटींत शहरातील स्वच्छता होऊ शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:59 IST2017-10-31T00:58:55+5:302017-10-31T00:59:06+5:30

दोन कोटी रुपयांमध्ये शहरातील कच-याची ठिकाणे स्वच्छ राहतील; परंतु मी पालिकेला दिलेला हा सल्ला काही जणांच्या पचनी पडला नसल्याचे मत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी व्यक्त केले.

Cleanliness in the city can be made in 2 crores | २ कोटींत शहरातील स्वच्छता होऊ शकेल

२ कोटींत शहरातील स्वच्छता होऊ शकेल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दोन कोटी रुपयांमध्ये शहरातील कच-याची ठिकाणे स्वच्छ राहतील; परंतु मी पालिकेला दिलेला हा सल्ला काही जणांच्या पचनी पडला नसल्याचे मत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी व्यक्त केले. ते म्हणाले, शहर स्वच्छ ठेवणे सोपे आहे. प्रत्येक शंभर मीटरवर कचराकुंडी ठेवली पाहिजे. २ कोटींच्या आसपास ते सगळे होईल, असेही ते म्हणाले.
मनपा हद्दीमध्ये हागणदारीमुक्त योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या वृत्तावर ते म्हणाले, मनपा, नगरपालिकांच्या कारभाराबाबत मी साशंक आहे. याबाबत स्वतंत्र तक्रार आली तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल. जर कुणी पुढे आले नाहीतर सुमोटो (स्वत:हून तक्रार) करून तपासणी करण्याचा इशारा त्यांनी दिला. पर्यटनवृद्धीसाठी प्रशासकीय स्तरावर बैठका सुरू आहेत. १५ दिवसांत अजिंठा लेणीपर्यंत जाणारा मार्ग खुला होईल. १०० कोटींतून होणा-या रस्त्यांमुळे शहराला लाभ होण्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Cleanliness in the city can be made in 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.