शहरातील ६८ नाल्यांची होणार सफाई; पालिकेची स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: May 23, 2017 00:14 IST2017-05-23T00:13:07+5:302017-05-23T00:14:37+5:30
जालना : नगर पालिकेने शहरातील मोठे तसेच लहान नाल्यांची पावसाळा पूर्व स्वच्छता मोहीम सोमवारी सुरू केली.

शहरातील ६८ नाल्यांची होणार सफाई; पालिकेची स्वच्छता मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगर पालिकेने शहरातील मोठे तसेच लहान नाल्यांची पावसाळा पूर्व स्वच्छता मोहीम सोमवारी सुरू केली.
नवीन व जुना जालना विभाग मिळून ६८ नाले आहेत. या सर्वच नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबते. मोठा पाऊस झाल्यास सकल भागात पाणी साचते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ७ जेसीबी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
काही भागात नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने नाल्यांची सफाई करणे जिकिरीचे झाले आहे. नाल्यांची वर्षभर सफाई होत नसल्याने या नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे. नाल्यासोबतच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
भाग्यनगर येथे नाला स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, स्वच्छता सभापती मोहमद नजीब, एकबाल पाशा, शाहआलम खान, शेख शकील, संजय देठे, जयंत भोसले, इसा खान, आमेर पाशा, अब्दुल रहिम, किशोर गरदास, विजय पांगारकर, गोपीकिशन गोगडे, शेख मुजीब, शाकीर खान, स्वच्छता विभागप्रमुख नारायण बिटले आदी उपस्थिती होते.