खाम नदीला जोडलेल्या नाल्यांची सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST2021-04-27T04:05:26+5:302021-04-27T04:05:26+5:30
महापालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी, इको सत्त्व आणि सीआयआयच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन ...

खाम नदीला जोडलेल्या नाल्यांची सफाई
महापालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी, इको सत्त्व आणि सीआयआयच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी खाम नदीला जोडणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले. यासंदर्भात मनपाकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले की, यासाठी नऊ जणांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. त्यात प्रत्येक प्रभागाच्या एक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही टीम स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ यांच्या नेतृत्वात काम करते. रेणुका गायकवाड, जितेंद्र भाले, मोहम्मद युसुफ आणि आम्रपाली डोंगरे यांचा समावेश असलेल्या इको सत्त्वच्या टीम रहिवाशांमध्ये जनजागृती करण्याचे काम करते. तसेच साफसफाईसाठी दोन जेसीबी, उत्खनन मशीन, दोन टिप्पर आणि एक पोकलेन देण्यात आले आहे. जिथे जेसीबी किंवा मोठ्या मशीन वापरता येत नाहीत तिथे कर्मचाऱ्यांमार्फतच सफाई केली जात आहे. आतापर्यंत १५४ ट्रक कचरा व गाळ उचलण्यात आला आहे. नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये, यासाठी चार पुलांवर बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. रहिवासी आणि व्यावसायिकांनी नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.