स्वच्छ शाळा पुरस्कार योजनेचा फज्जा

By Admin | Updated: July 28, 2016 01:01 IST2016-07-28T00:16:06+5:302016-07-28T01:01:51+5:30

बीड : विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावेत व त्यांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी शासनाने स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा केली होती.

Clean School Prize Scheme | स्वच्छ शाळा पुरस्कार योजनेचा फज्जा

स्वच्छ शाळा पुरस्कार योजनेचा फज्जा

बीड : विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावेत व त्यांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी शासनाने स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा केली होती. मात्र, या पुरस्कार योजनेचा जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला आहे. स्पर्धा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केवळ ३१ शाळांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात जि.प. च्या २५५३ व खासगी मिळून ३५०० वर शाळा आहेत. स्वच्छ विद्यालय पुरस्कार ही स्पर्धा जि.प. सह अनुदानित, विनाअनुदानित शाळांसाठी लागू होती. १ जुलै रोजी शिक्षण विभागाने पुरस्काराची घोषणा केली होती. त्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत स्पर्धेच्या अनुषंगाने ना मुख्याध्यापकांनी रस दाखवला, ना शिक्षकांनी यात पुढाकार घेतला. त्यामुळे स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलीच नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी ३१ जुलैपर्यंत शासनाच्या एमएचआरडी या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करावयाची होती. शिवाय मोबाईल अ‍ॅपवर मिसकॉल देऊन प्रश्नावली प्राप्त करून त्याची उत्तरे द्यावयाची होती. मात्र, या स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी शाळांकडून हवा तसा प्रतिसाद नाही. पुरस्कारासाठी पाण्याची उपलब्धता, शौचालय, वैयक्तिक आरोग्याची काळजी, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास असे निकष ठेवण्यात आले होते. शिवाय, शाळांना रंगानुसार गुण द्यावयाचे होते. ९० ते १०० दरम्यान गुण असलेल्या शाळांना हिरवा तर ३५ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या शाळांना लाल रंग द्यावयाचा होता. मात्र, शाळांनी या महत्त्वाच्या स्पर्धेकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना पूर्णत: बारगळल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने यासाठी मुख्याध्यापकांच्या दोन बैठकाही घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Clean School Prize Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.