सर्वच पक्षांतील नेत्यांचे विजयाचे दावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:57 IST2017-10-04T23:57:32+5:302017-10-04T23:57:32+5:30
महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना, सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत़ पक्षात शेवटच्या फळीतील कार्यकर्ताही पक्षाच्या किती जागा येणार याची आकडेमोड करण्यात गुंतले आहेत़

सर्वच पक्षांतील नेत्यांचे विजयाचे दावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना, सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत़ पक्षात शेवटच्या फळीतील कार्यकर्ताही पक्षाच्या किती जागा येणार याची आकडेमोड करण्यात गुंतले आहेत़
यंदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम हे प्रमुख पक्ष आहेत़ या पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे़ त्यात काँग्रेसने ६५ हून अधिक जागा येतील, असा दावा केला आहे़ तर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरलेल्या भाजपानेही ५१ पेक्षा अधिक जागा येतील, असा दावा केला आहे़
तर शिवसेनाही महापालिकेवर भगवा फडकेल असे जाहीर भाषणात सांगत आहेत़
पक्षातील नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही गणित जुळवत आहेत़ जो-तो आपल्या पक्षाला किती जागा मिळतील याची आकडेमोड करीत आहे़ त्यासाठी वेगवेगळे स्थानिक संदर्भ देण्यात येत आहेत़, परंतु कार्यकर्ते आणि नेत्यांचे अंदाज किती खरे ठरतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे़