शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर मंदिरच्या मालकी हक्काबाबतचा दावा; राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे; सुनावणीप्रसंगी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:53 IST

खुलताबादच्या तहसीलदारांनी २०१० मध्ये पुरातत्व विभागाचे नाव सातबाऱ्यावर घेतले, तर पुजारी रवींद्र प्रल्हादराव पुजारी यांचे इतर हक्कात नाव घेतले.

औरंगाबाद : वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आणि मालमत्तेवर दावा सांगणारा पुजारी मंदिराचे संवर्धन आणि संरक्षणासाठी किती रुपये खर्च करतो असा प्रश्न पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे सुनावणीप्रसंगी उपस्थित करण्यात आला. ६१ वर्षांपूर्वी राजपत्र (गॅझेट नोटिफिकेशन) प्रसिद्ध झाले आहे. त्यात भारत सरकारने संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी पुरातत्व विभागाला दिली आहे. त्यामुळे राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे, अशी विचारणा सुनावणीप्रसंगी करण्यात आली.

घृष्णेश्वर मंदिर आणि मंदिराच्या १३ एकर २ गुंठे मालमत्तेच्या मालकी हक्कात नाव दाखल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी प्रतिवादी पुजाऱ्यास नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर ३ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिकाघृष्णेश्वर मंदिर व मंदिराचा सर्व्हे क्र. २९९ मधील १३ एकर २ गुंठे जमीन संवर्धन आणि संरक्षणासाठी केंद्र सरकारने पुरातत्व सर्वेक्षण विभागास २७ सप्टेंबर १९६० मध्ये दिली होती. तेव्हापासून पुरातत्व विभाग वरील वास्तूची देखभाल व सुरक्षा करीत आहे. मंदिराच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी नेमले आहेत. त्यांना पुरातत्व विभागामार्फत वेतन दिले जाते. खुलताबादच्या तहसीलदारांनी २०१० मध्ये पुरातत्व विभागाचे नाव सातबाऱ्यावर घेतले, तर पुजारी रवींद्र प्रल्हादराव पुजारी यांचे इतर हक्कात नाव घेतले.

पुजाऱ्याचे म्हणणेपुजारी पुराणिक यांचे म्हणणे आहे की, सदर इनामी जमीन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबीयांनी दान केलेली आहे. मालकी हक्कात आपले नाव घ्यावे. यासाठी त्याने न्यायालयात दावा दाखल केला होता. होळकर कुटुंबीयांनी ज्याला जमीन दान केली त्यास पुत्र नसल्याने त्याने पुत्र दत्तक घेतला. संबंधित दत्तक पुत्रालाही पुत्र झाला नसल्याने त्यांनीसुद्धा पुत्र दत्तक घेतला. असे पुढच्या पिढीतही दत्तक पुत्रच घेण्यात आले आहेत. पुजारी पुराणिकदेखील दत्तक पुत्र असल्याचे पुरातत्व विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. पुराणिक यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे मालकी हक्कासाठी दावा दाखल केला असता दावा मंजूर करण्यात आला. यास जिल्हा न्यायालयानेही आपिलात मंजुरी दिली. दोन्ही न्यायालयांनी पुराणिक यांचा मंदिर आणि त्याच्या जागेवर ताबा असल्याचे मान्य केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ