शहरात चोरी-छुपे ‘दम मारो दम’चा धंदा जोरात सुरूच!
By Admin | Updated: June 14, 2016 00:09 IST2016-06-14T00:03:13+5:302016-06-14T00:09:46+5:30
औरंगाबाद : तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याने शासनाने राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणलेली आहे. मात्र, आजही शहरातील अनेक छोट्या हॉटेल्स,

शहरात चोरी-छुपे ‘दम मारो दम’चा धंदा जोरात सुरूच!
औरंगाबाद : तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याने शासनाने राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणलेली आहे. मात्र, आजही शहरातील अनेक छोट्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये चोरी-छुपे हुक्का पार्लर चालविले जात आहेत. बुढीलेन येथे पाकिजा हॉटेलच्या बाजूला रविवारी सिटीचौक पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दररोज रात्री उशिरापर्यंत येथे उच्चभ्रू वर्गातील केवळ मुलेच नव्हे तर मुलीदेखील येथे झुरके मारत बसलेल्या असतात.
गेल्या काही वर्षांमध्ये युवा पिढीत हुक्का पिणे एक ‘स्टेटस’चा भाग बनलेले आहे. तरुणांबरोबरच अनेक तरुणी हुक्क्याच्या आहारी गेलेल्या आहेत. चार वर्षांपूर्वीपर्यंत अनेक हॉटेल, कॉफी शॉप्स, रेस्टॉरंटमध्ये राजरोसपणे हुक्का पार्लर चालायचे. अनेक मोठ्या महाविद्यालयांच्या जवळपास खास हुक्का पार्लरच सुरू झालेले होते. हुक्क्यामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने अखेर हुक्क्यावर बंदी आणली. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून हे पार्लर बंद पाडले. मात्र, बंदी असली तरी आजही चोरी-छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी हे हुक्का पार्लर सुरूच आहेत. सिटीचौक परिसरातील बुढीलेनमध्ये पाकिजा हॉटेलजवळ अशाच चोरी-छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर रविवारी रात्री सिटीचौक पोलिसांनी छापा मारून तेथून पार्लरचालकासह १५ जणांना पकडले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
अँटी चेंबरसारख्या खोल्या...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजही औरंगाबाद शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप्समध्ये हुक्का पार्लर सुरू आहेत. उस्मानपुरा परिसरात काही हॉटेल, पानटपऱ्यांवर हुक्का देण्यात येतो. शिवाय सिडको परिसर, निरालाबाजार परिसर, दौलताबाद रोडवरील मोठ्या हॉटेलमध्येही छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्यात येत आहेत. तसेच बीड बायपास रोडवर एमआयटी महाविद्यालयाच्या आसपास दोन ठिकाणी आणि जालना रोडवर (पान ४ वर)
शासनाने हुक्का पार्लरवर बंदी तर आणली आहे; परंतु ते चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे पार्लर चालविणाऱ्याला पकडल्यानंतर पोलिसांना मुंबई पोलीस अॅक्टनुसार साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करावा लागतो. त्यामुळे आरोपींची तात्काळ पोलीस ठाण्यातून मुक्तता करावी लागते. अशा कुचकामी कायद्यामुळेच बंदी असतानाही हुक्का पार्लर चालविण्याचे धाडस अनेक जण करीत आहेत. काल सिटीचौक पोलिसांनी बुढीलेनमध्ये पकडलेल्या पार्लरचालकाची ही पकडल्या जाण्याची तिसरी वेळ होती, असे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.४
एकीकडे हुक्का पार्लरवर बंदी आहे. तर दुसरीकडे हुक्क्यासाठी लागणारी गुडगुडी, त्यासाठी लागणारे फ्लेव्हर व इतर साहित्याची औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसर, दिल्लीगेट, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर परिसरातील पानटपऱ्यांवर राजरोसपणे विक्री सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे, हे विशेष. 1
हुक्का पाजण्यातून मोठी कमाई होत असल्यानेच बंदी असतानाही ‘रिस्क’ घेऊन चोरी-छुपे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉपचालक हा धंदा करीत आहेत. चारशे ते सातशे रुपयांमध्ये एका ग्रुपला १ तास हुक्का पिण्यासाठी देण्यात येतो. 2
फ्लेव्हरनुसार त्याचे दर ठरविले जातात. एका दिवसात एका पार्लरमध्ये केवळ हुक्क्यातून आठ- दहा हजारांची कमाई होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासोबत जेवण, चकणाचे इतर बिल वेगळेच असते.