दुसऱ्या दिवशीही शहरातील वीजपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: November 16, 2014 00:39 IST2014-11-16T00:16:06+5:302014-11-16T00:39:10+5:30
औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशीही शहरातील वीजपुरवठा विस्कळीत
औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे जीटीएलच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे काम बंद केले आहे. अनेकांनी खोडसाळपणाच्या भूमिकेतून वीजपुरवठा खंडित केला होता. कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे दि.१४ नोव्हेंबर रोजीही अर्धे शहर अंधारात होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी (शनिवारी) हा प्रकार पाहावयास मिळाला. त्यामुळे अर्ध्या शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
डी.पी.मधील आॅईल, फ्यूज, ए., बी. स्वीच काढणे आदी प्रकार जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. काही भागांत रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी पोहोचू शकले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी जीटीएल आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण वीज वितरण व्यवस्था कोलमडली.