शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शहर यलो झोनमध्ये

By admin | Updated: December 28, 2015 00:28 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद सुधारित शहर विकास आराखड्यात मनपाच्या वाढीव हद्दीतील सर्व ग्रीन झोन यलो म्हणजे निवासी वापराच्या भागात परावर्तित करण्यात आले आहेत.

सुनील कच्छवे , औरंगाबादसुधारित शहर विकास आराखड्यात मनपाच्या वाढीव हद्दीतील सर्व ग्रीन झोन यलो म्हणजे निवासी वापराच्या भागात परावर्तित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला लागून असलेला मोकळा परिसर निवासी वापरासाठी खुला होणार आहे. हा मोठा बदल करताना मध्यवर्ती भागातील जुनी आरक्षणे मात्र तशीच ठेवण्यात आली आहेत. शिवाय शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता सुधारित आराखड्यात २ नवीन पर्यायी रस्तेही प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे.सुधारित विकास आराखडा उद्या सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. राज्याच्या नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वीच हा आराखडा बंद पाकिटात मनपा आयुक्तांच्या स्वाधीन केला. तो उद्या पहिल्यांदाच आधी सर्वसाधारण सभेत आणि नंतर जनतेसाठी प्रसिद्ध होईल; परंतु त्याआधीच आराखड्यातील ढोबळ तरतुदींची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. या आराखड्यात विकासाचा सर्वंकष विचार करून आरक्षणे टाकण्यात आली आहेत. निवासी वापराची वाढती गरज, सोशल अ‍ॅमेनिटीजची आरक्षणे, रस्ते, शासकीय कार्यालयांसाठीच्या जागेची मागणी, गुंठेवारी भाग अशा अनेक बाबींचा यात विचार झाला आहे. निवासी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होणार असल्यामुळे बेकायदा प्लॉटिंगचे उच्चाटन होण्याची शक्यता आहे.आराखडा चार वर्षे उशिरानेऔरंगाबाद महानगरपालिका ८ डिसेंबर १९८२ रोजी अस्तित्वात आली. त्यासोबतच शहरालगतच्या १८ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. या वाढीव क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा १९८५ साली प्रसिद्ध (पान १ वरून)करण्यात आला; परंतु त्यात निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर दर्शविण्यात आले होते. म्हणून त्यात बदल करून तो १९८८ साली पुन्हा प्रसिद्ध झाला. त्याला १९९१ साली शासनाची मंजुरी मिळाली. नियमानुसार २० वर्षांनंतर म्हणजे २०११ मध्ये त्या विकास आराखड्यात सुधारणा गरजेची होती. त्यासाठी मनपाने ठराव घेऊन हे काम राज्याच्या नगररचना खात्याकडे दिले; परंतु ही जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत गेल्या. त्यामुळे हे काम रखडले होते. नंतर सरकारने ही जबाबदारी कोल्हापूर विभागातील सहसंचालक एम.आर. खान यांच्याकडे सोपविली. त्यांनी हा सुधारित आराखडा तयार करून राज्य सरकारकडे सुपूर्द केला. राज्य सरकारकडून दीड महिन्यापूर्वीच तो मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने आता या आराखड्याच्या कामाची जबाबदारी लातूरचे उपसंचालक शिवराज पाटील यांच्याकडे दिली आहे. शहरातील भूखंडांवरील जुनी आरक्षणे कायम.४वाढीव हद्दीतील सर्व ग्रीन झोन यलो झोनमध्ये (निवासी वापरासाठी) परावर्तित. ४चिकलठाण्याकडून शहरात येण्यासाठी नारेगावमार्गे जालना रोडला पर्यायी नवीन रस्ता.४१८ गावांच्या हद्दीत जागोजागी स्मशानभूमी, दफनभूमीची आरक्षणे.४जटवाडा रोडलगत गोल्फकोर्सचे आरक्षण.४विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १४० हेक्टर जागेवर आरक्षण.४शासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी गायरान जमिनींवर आरक्षण.४अल्प उत्पन्न गटातील घरांच्या बांधकामाकरिता म्हाडाला देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी २५० एकर जागा आरक्षित.४मनपाच्या प्राणिसंग्रहालयासाठी मिटमिटा येथे २०० हेक्टर जागा आरक्षित.४मिटमिटा, पडेगाव, चिकलठाणा आदी भागांत ७ ठिकाणी शॉपिंग मॉलचे आरक्षण.४बीड बायपासलगत आठ ठिकाणी कमर्शियल झोनिंग.४जटवाडा ते जुने शहर यादरम्यान मकबरामार्गे नवीन रस्ता प्रस्तावित.४गुंठेवारी भागात केवळ रिकाम्या भूखंडांवरच अ‍ॅमेनिटीसाठीची आरक्षणे.