सर्वोपचार रुग्णालयात अखेर सिटी स्कॅन सेवा
By Admin | Updated: March 30, 2015 00:41 IST2015-03-30T00:33:20+5:302015-03-30T00:41:40+5:30
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालायात मागील ३ वर्षांपासून सिटीस्कॅन मशीन बंद होती़

सर्वोपचार रुग्णालयात अखेर सिटी स्कॅन सेवा
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालायात मागील ३ वर्षांपासून सिटीस्कॅन मशीन बंद होती़ त्यामुळे गरीब रुग्णांना ही सेवा मिळत नव्हती़ यावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशी जपान देशाच्या बनावटीचे तोषीबा कंपनीची सीटिस्कॅन मशीन बसविण्यात आली असून त्याची सेवा रूग्णांना शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे़
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २००६ मध्ये जिल्हा रुग्णालय वर्ग करण्यात आले़ जिल्हा रूग्णालय हे सर्व चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले़ तेव्हापासून शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणातील जिल्हा रूग्णालय हे अधिष्ठातांच्या नियंत्रणाखाली गेले़ जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन बंद पडले़ बंद पडलेले मशिन चालू करण्यासाठी वारंवार खर्च करावा लागत असल्याने त्याच्या दुरूस्तीचा खर्च हा महाविद्यालयाच्या प्रशासनाला परवडेनासा झाला़ त्यामुळे ही मशिन बंद ठेवून नवीन मशिनचा प्रस्ताव तत्कालीन अधिष्ठाता डॉ़ दीप्ति डोणगावकर यांनी शासनाकडे पाठविला़ शासनाने हा प्रस्ताव तात्काळ मंजूर केला़ पण ही मशिन उपलब्ध होण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला़ राज्य शासनाने जपान बनावटीची अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिन उपलब्ध करून दिली आहे़ या सिटीस्कॅन मशिनव्दारे १० मिनिटात पूर्ण शरीराचे स्कॅन करता येते, असे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)