सिटी राऊंडअप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:05 IST2021-08-26T04:05:32+5:302021-08-26T04:05:32+5:30

सिडको पोलीस ठाण्यात रक्षाबंधन औरंगाबाद : राखी पौर्णिमेनिमित्त महा एनजीओ आणि धम्मदीप सामाजिक विकास परिसर संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त ...

City Roundup | सिटी राऊंडअप

सिटी राऊंडअप

सिडको पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

औरंगाबाद : राखी पौर्णिमेनिमित्त महा एनजीओ आणि धम्मदीप सामाजिक विकास परिसर संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको एन-७ पोलीस ठाण्यात बीज राखी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक सलगर, सतीश कोरडे, विठ्ठल काकडे, ज्ञानेश्वर फुके, गणेश नवतुरे, श्याम गायकवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी सुनीता लेंडे, रुख्मिणी मुकाडे, मनीषा शिंदे, संगीता सागरे यांचे औक्षण करून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सरिता नीलेश घोडतुरे, राणी बेहेडे, पूजा सोनवणे, मीरा चव्हाण, वंदना पाटील, सविता कुंटे, ऋतुजा घोडतुरे यांची उपस्थिती हाेती. या उपक्रमासाठी शेखर मुंदडा, चंद्रकांत राठी, मुकुंद शिंदे, राहुल पाटील यांनी सहकार्य केले.

(फोटो)

गोपीनाथ वाघ यांची निवड

औरंगाबाद : भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी गोपीनाथ आसाराम वाघ यांची निवड करण्यात आली. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.

Web Title: City Roundup