नगराध्यक्ष आज ठरणार

By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-11T00:11:24+5:302014-07-11T00:57:23+5:30

सेलू : येथील नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक होत आहे़

The city president will decide today | नगराध्यक्ष आज ठरणार

नगराध्यक्ष आज ठरणार

सेलू : येथील नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक होत आहे़ काँग्रेसकडून सुरेश कोरडे तर सेनेचे संजय धापसे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असली तरी काँग्रेसकडे १६ मते तर शिवसेनेकडे केवळ पाच मते असल्यामुळे सुरेश कोरडे यांची नगराध्यक्षपदासाठी निवड जवळपास निश्चित आहे़
आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाचे दहा व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक असे सोळा मते काँग्रेसकडे आहेत़ शिवसेनेचे पाच मते आहेत़ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यात दिलजमाई झाल्यामुळे निवडणुकीची औपचारिकता फक्त उरली आहे़
गतवेळी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती़ त्यावेळी पवन आडळकर हे सेनेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाले होते़ काही दिवसापूर्वीच आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या गटाकडून नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात होते़ त्यामुळे नगरसेवकांना महत्व प्राप्त झाले होते़ काही दिवस नगरसेवक सहलीवरही रवाना झाले होते़ परंतु, शनिवारी आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यात दिलजमाई झाल्याने काँग्रेसकडे पंधरा नगरसेवक एकत्र आले़ त्यामुळे अन्य पक्षाच्या नगरसेवकांना महत्व राहिले नाही़
नगरपालिका सभागृहात शुक्रवारी दुपारी १२ वाजता पीठासन अधिकारी वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून याचवेळी निवडणूक होणार आहे़
सकाळी १० ते १२ या वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत़ नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे़ दरम्यान, आ़ रामप्रसाद बोर्डीकर व विनोद बोराडे यांचे गट एकत्र आल्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे़ (प्रतिनिधी)
उपनगराध्यक्षपदासाठी कोण ?
नगराध्यक्षपदासाठी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी गटनेते सुरेश कोरडे यांचे नाव जाहीर केले़ परंतु, उपनगराध्यक्षपदासाठी विनोद बोराडे गटाला संधी दिली जात असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे बोराडे गटाच्या शाहीनबी अ़ वहिद यांना उपनगराध्यक्ष पद मिळू शकते किंवा मुश्ताक अहेमद यांचीही ऐनवेळी वर्णी लागू शकते़

Web Title: The city president will decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.