नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:47 IST2018-04-25T00:45:47+5:302018-04-25T00:47:07+5:30
थेट जनतेमधून निवडून आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी मंगळवारी प्रशासक डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्याकडून पदभार स्वीकारला.

नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी स्वीकारला पदभार
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : थेट जनतेमधून निवडून आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी मंगळवारी प्रशासक डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्याकडून पदभार स्वीकारला.
वैजापूर शहराच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे शिल्पा परदेशी यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक साबेरखान, जयश्री राजपूत, माधुरी बनकर, संगीता गायकवाड, शोभा भुजबळ, लता मगर, सुप्रिया व्यवहारे, प्रीती भोपळे, स्वप्नील जेजूरकर, नंदाबाई त्रिभुवन, उल्हास ठोंबरे, गोविंद धुमाळ, मजीद कुरेशी, राजूसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती. सभागृहात माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी व खुशालसिंह राजपूत यांची भाषणे झाली.