शहर पोलीस, उच्च न्यायालय, कम्बार्इंड बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:27 AM2018-03-31T00:27:23+5:302018-03-31T11:19:32+5:30

एमजीएम मैदानावर सुरूअसलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, उच्च न्यायालय वकील, कम्बार्इंड बँकर्स अ संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. आज झालेल्या सामन्यात प्रीतेश चार्ल्स, प्रल्हाद बचाटे व गौरव गंगाखेडकर सामनावीर ठरले.

City Police, High Court, Camberind Bankers | शहर पोलीस, उच्च न्यायालय, कम्बार्इंड बँकर्स विजयी

शहर पोलीस, उच्च न्यायालय, कम्बार्इंड बँकर्स विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरूअसलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, उच्च न्यायालय वकील, कम्बार्इंड बँकर्स अ संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. आज झालेल्या सामन्यात प्रीतेश चार्ल्स, प्रल्हाद बचाटे व गौरव गंगाखेडकर सामनावीर ठरले.
आज झालेल्या पहिल्या लढतीत अमित पाठक याने ५१ चेंडूंतच ८ टोलेजंग षटकार व ६ चौकारांसह केलेल्या ९१ धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर एमजीएम अ संघाने २0 षटकांत १६७ धावा ठोकल्या. अमितसह अमरदीप असोलकरने १९ व रहीम खान याने १५ धावा केल्या. शहर पोलीसकडून प्रीतेश चार्ल्सने ३३ धावांत ३ गडी बाद केले. अहमद शेख व अलीम शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघाने विजयी लक्ष्य १७.४ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रीतेश चार्ल्सने ४0 चेंडूंतच ७ उत्तुंग षटकार व ९ चौकारांसह ९१ धावांची निर्णायक खेळी केली. अजिम शेखने १९ धावा केल्या. एमजीएम अ कडून अब्दुल शमीने २0 धावांत ३ तर रहिमने २ व अमित पाठकने १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ई संघाविरुद्ध उच्च न्यायालय संघाने २0 षटकांत ५ बाद १५0 धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल जाधवने ५ चौकारांसह ४0, श्रीसागर अंबिलवादीने ३७ व ज्ञानेश्वर पाटीलने १८ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी संघाकडून आवेज पटेल, उबेद खान, मोहंमद अयाजुद्दीन, जावेद सय्यद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघ १३.२ षटकांत ६३ धावांत गारद झाला. त्याच्याकडून सय्यद जावेदने २४ धावा केल्या. उच्च न्यायालय संघाकडून प्रल्हाद बचाटे याने ९ धावांत ५ तर सचिन जैस्वालने ३ व पवन इप्पार आणि निखिल राजे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तिसºया सामन्यात कम्बार्इंड बँकर्सने २0 षटकांत १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून गौरव गंगाखेडकरने २ षटकार व ११ चौकारांसह ७९, जावेद शेखने २३, मिलिंद पाटीलने २२ व रवी शेरेने १६ धावा केल्या. महावितरण ब संघाकडून बाळासाहेब मगरने १८ धावांत ३ गडी बाद केले. कैलास शेळके, अनिकेत काळे, संजय बनकर, अतिक खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण ब संघ १९.२ षटकांत १४३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून संतोष आवाळेने ६ चौकारांसह ३९, बाळासाहेब मगरने ३८ धावा केल्या. कम्बार्इंड बँकर्सकडून दिनेश कुंटे व जावेद शेख यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे २८ व १५ धावा मोजल्या. मिलिंद पाटील, हिरल शाह, महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: City Police, High Court, Camberind Bankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.