शहराची पुन्हा कोरोना मृत्यूवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:21+5:302021-07-07T04:06:21+5:30

औरंगाबाद : शहराने मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. उपचार सुरू ...

The city overcame Corona's death again | शहराची पुन्हा कोरोना मृत्यूवर मात

शहराची पुन्हा कोरोना मृत्यूवर मात

औरंगाबाद : शहराने मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, सध्या ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचा आलेख घसरला असून, जिल्हा मृत्यूच्या संकटापासून दूर जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात शहरात ११ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ४८० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ६२ अशा ७६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४२३ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

स्वस्तिकनगर १, जाधववाडी १, एन-३, सिडको १, कैसर कॉलनी १, स्टेशन रोड फॉरेस्ट कॉलनी २, पन्नालालनगर १, गारखेडा परिसर १, एन-१२, हडको १, घाटी १, सातारा परिसर १

ग्रामीण भागातील रुग्ण

सिडको महानगर-१ येथे २, दौलताबाद १ यासह विविध गावांमध्ये २९ कोरोना रुग्णांची भर पडली.

Web Title: The city overcame Corona's death again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.