‘नगर भूमापन’ चा
By Admin | Updated: June 13, 2015 23:47 IST2015-06-13T23:47:44+5:302015-06-13T23:47:44+5:30
जालना : येथील भूमि अभिलेख कार्यालयात लवकरच स्वतंत्र सहा पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल,

‘नगर भूमापन’ चा
जालना : येथील भूमि अभिलेख कार्यालयात लवकरच स्वतंत्र सहा पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा निर्मिती होऊन सुमारे ३४ वर्षे उलटली. परिणामी विस्तारही झपाट्याने होऊ लागला आहे. विशेषत: १९९५ नंंतर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून या शहराचा जलदगतीने विस्तार झाला. शहरातील मालमत्ताधारकांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे. या मालमत्तांची संख्या लक्षात घेता भूमि अभिलेख विभागाचे स्वतंत्र नगर भूमापन कार्यालय असणे आवश्यक आहे. परंतु २००८-०९ मध्ये स्वतंत्र कार्यालयासाठी मंजुरी मिळाल्यानंतर देखील प्रत्यक्षात कार्यालय अस्तित्वात आलेले नाही.
त्यामुळे जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये १९७६ च्या पदस्थापनेनुसारच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कामाचा ताण वाढू लागल्याने या कार्यालयात नवीन बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. यापूर्वी भूमि अभिलेख कार्यालय म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचाही मोठ्या प्रमाणावर अभाव होता. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या कार्यालयास काही नवीन सुविधा मिळण्यास प्रारंभ झाला आहे.
यामध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांबरोबरच जमिनीची जलद मोजणी करणारे १० एटीएस मशीन मिळणार आहेत. (वार्ताहर)
मालमत्ता संख्येच्या तुलनेत या कार्यालयात १० पर्यवेक्षक भूमापकांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात तीनच पदे मंजूर असून त्यापैकी दोन रिक्त आहेत, तर एक दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे सध्या या तिन्ही पदांवर प्रतिनियुक्ती केलेले कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु आता तीन पदे वाढवून नव्याने सहा कर्मचारीही नियुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.