शहर अभियंत्यास कोंडले चक्क आयुक्त दालनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST2017-07-18T01:12:21+5:302017-07-18T01:14:14+5:30

औरंगाबाद : महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली यांना सोमवारी सायंकाळी सुरक्षा रक्षकांनी चक्क आयुक्त दालनात कोंडून निघून गेले

City Engineer Condole Chuck Commissioner! | शहर अभियंत्यास कोंडले चक्क आयुक्त दालनात !

शहर अभियंत्यास कोंडले चक्क आयुक्त दालनात !

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली यांना सोमवारी सायंकाळी सुरक्षा रक्षकांनी चक्क आयुक्त दालनात कोंडून निघून गेले. त्यांची सुटका करण्यासाठी सायंकाळी उशिरा महापालिकेत एकच धावपळ उडाली होती. शहर अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांची अखेर सुटका केली.
त्याचे झाले असे की, सोमवारी सायंकाळी आयुक्त दालनाच्या पाठीमागे स्वीय सहायकांच्या कक्षात शहर अभियंता सिकंदर अली बसले होते. बराच वेळ ते येथेच बसून काम करीत होते. यावेळी स्वीय सहायक सुनील ढेकळेही सुटीवर होते. इतर कर्मचारीही ६ वाजताच निघून गेले. कार्यालयातील शिपाई व सुरक्षा रक्षकांना सिकंदर अली हे आत असल्याचे माहीत नव्हते. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून पळ काढला. बऱ्याच वेळानंतर सिकंदर अली यांना आपण कोंडल्या गेलो असे लक्षात आले.

Web Title: City Engineer Condole Chuck Commissioner!