शहरात आठ ट्रक फटाके दाखल

By Admin | Updated: October 19, 2014 00:41 IST2014-10-19T00:29:29+5:302014-10-19T00:41:52+5:30

औरंगाबाद : दिवाळीसाठी शिवकाशीहून शनिवारपर्यंत ८ ट्रक फटाके शहरात दाखल झाले. येत्या दोन दिवसांत आणखी ३ ट्रक फटाके येणार आहेत.

In the city eight truck fire crackers filed | शहरात आठ ट्रक फटाके दाखल

शहरात आठ ट्रक फटाके दाखल

औरंगाबाद : दिवाळीसाठी शिवकाशीहून शनिवारपर्यंत ८ ट्रक फटाके शहरात दाखल झाले. येत्या दोन दिवसांत आणखी ३ ट्रक फटाके येणार आहेत. याशिवाय मागीलवर्षाचे शिल्लक २० टक्के फटाकेही आणले आहेत. एकंदरीत ३ कोटींच्या फटाक्यांचा धडाडधूम शहरवासी अनुभवणार आहेत. उद्या रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल असून विजयी झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी करतील.
दिवाळी आणि फटाके हे समीकरण पक्के जमले आहे. आजही फटाक्यांची खरेदी पूर्वीइतक्याच जोमात होते. बदल झालाय तो फटाक्यांच्या स्वरूपात. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाचे अ‍ॅटमबॉम्ब आहेतच, शिवाय सौम्य आवाज करीत लखलखणारे फटाकेही आहेत. यंदा शहर व आसपासच्या परिसरात फटाक्यांच्या तात्पुरत्या दुकानांना अग्निशामक दलाने परवानगी दिली आहे.
यात सर्वाधिक १८० दुकाने औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर उभारली आहेत. टी.व्ही. सेंटर मैदान ९८, राजीव गांधी क्रीडांगण, एन-५ सिडको २६, एम-२ परिसरात ३७, मुकुंदवाडीत ६, चिकलठाणा ११, शिवाजीनगर १६, छावणी १२, माळीवाडा २, दौलताबाद ७, रांजणगाव १५ व जोगेश्वरी २, अशा एकूण ४२२ दुकानांचा समावेश आहे. फटाक्यांच्या परवाना शुल्कपोटी मनपाच्या तिजोरीत ३ लाख ९९ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत, तसेच शनिवारपर्यंत आलेल्या फटाक्यांवरील एलबीटी ३ लाख रुपये असे एकूण ७ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. फटाक्यांची बहुतांश दुकाने थाटली असून यंदा फटाक्यात नावीन्यता कमी आहे. कमी आवाजाचे व फॅन्सी फटाके बाजारात मोठ्या प्रमाणात आल्याची माहिती दत्ता खामगावकर यांनी दिली.

Web Title: In the city eight truck fire crackers filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.