‘दुपट्टा गँग’चा शहरात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:29 IST2016-05-25T00:24:55+5:302016-05-25T00:29:57+5:30
औरंगाबाद : बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीने रविवारी रात्री मोंढ्यातील आणखी तीन दुकाने फोडल्याचे आढळून आले आहे.

‘दुपट्टा गँग’चा शहरात धुमाकूळ
औरंगाबाद : बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीने रविवारी रात्री मोंढ्यातील आणखी तीन दुकाने फोडल्याचे आढळून आले आहे. एका दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात ही ‘दुपट्टा गँग’ कैद झाली आहे. तीन दुकानांमधून ५६,७०० रुपयांचा ऐवज लांबवून या टोळीने पोबारा केला.
शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांना लगाम लावण्यात यापूर्वीच पोलीस अपयशी ठरले आहे. आता महिला चोरांच्या करामतींमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. महिला चोरांच्या टोळीने रविवारी रात्री बन्सीलालनगरातील पंकज अरोरा यांचे दुकान फोडून साडेसहा हजार रुपयांची रोकड पळविली होती. पहाटे ४.११ ते ४.१९ या आठ मिनिटांत या टोळीने कार्यभाग उरकला होता. अरोरा यांच्या दुकानातील ‘सीसीटीव्ही’त ही संपूर्ण घटना कैद झाली होती. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारच्या रात्री महिला चोरांच्या टोळीने मोंढ्यातील लक्ष्मण चावडी रस्त्यावरही धुमाकूळ घातला. अरोरा यांच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिलांनीच ही दुकाने फोडली काय, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दीपक चोपडा (रा. समर्थनगर) यांचे मोंढा रोडवर दुकान आहे. शनिवारी रात्री आठ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. रविवारी सुटी असल्याने चोपडा यांनी दुकान उघडले नाही. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ते दुकानात आले असता, शटर उघडे असल्याचे दिसले.