शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा फटका, छत्रपती संभाजीनगरात सिटी बसच्या प्रवाशांना दणका; तिकीटात २० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:49 IST

२०२२ सालचे दर आजपर्यंत कायम असल्याचा दावा विभागाने केला आहे; जाणून घ्या नवे तिकीट दर

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लि.ने सिटीबसच्या तिकीट दरांमध्ये १६ एप्रिलपासून २० टक्के दरवाढ केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि स्पेअर पार्ट्सचे भाव वाढल्यामुळे दरवाढ केल्याचे स्मार्ट शहर बस विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

२०१९ साली शहर बससेवा सुरू झाली. २०२२ सालचे दर आजपर्यंत कायम असल्याचा दावा विभागाने केला आहे. सध्या बस देखभाल, स्पेअर पार्ट्सचे दर वाढले आहेत. जानेवारी २०२५ पासून चालक व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ ४० टक्के वाढ झाली आहे. याचा आर्थिक बोजा स्मार्ट सिटी बस विभागावर पडला आहे. त्यामुळे प्रवासी भाडेवाढ करण्याविना पर्याय नाही. सध्या असलेल्या तिकीट दरामध्ये २० टक्के वाढ म्हणजेच किमान प्रवास भाडे ६ रुपये असणार आहे. प्रवासी भाडे पाच रुपयांच्या पटीत न ठेवता एक रुपयाच्या पटीत ठेवले आहे. सुट्या पैशांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

मार्ग...........................................आधीचे भाडे..............आजपासून किती भाडे ?सिडको बसस्थानक ते रांजणगाव.......३५............................४२ रुपयेसिडको बसस्थानक ते जोगेश्वरी...........४०......................४८

सिडको बसस्थानक ते करमाड ...........४०......................४८सिडको बसस्थानक ते फुलंब्री..............४५.......................५४

सिडको बसस्थानक ते रेल्वे स्टेशन ........२५....................३०हर्सूल टी पॉइंट ते फुलंब्री.....................३५......................४२

मध्यवर्ती बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट......२५..............३०स्टेशन ते बिडकीन...................३५............................४२

स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक........१५......................१७मध्यवर्ती बसस्थानक ते वेरूळ..............५०...................६०

सिडको बसस्थानक ते बाबा पेट्रोल पंप.......२०....................२३औरंगपुरा ते वाळूज पोलिस ठाणे..........३५.........................४२

औरंगपुरा ते नाईकनगर...................३०................................३६औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास..........३०.................................३६

सिडको बसस्थानक ते विद्यापीठ........३०...........................३६सिडको बसस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक.........२५..............३०

मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री ...................४५................५४

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका