शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे.शहर बससेवेत वाढ करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी १४ जुलै रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० बसेस सोडण्यात येत असून, दिवसभरात जवळपास १६० फेऱ्या होतील तर शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ बसेस सोडण्यात येणार (दिवसभरात १६८ फेऱ्या) आहेत. दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मार्गांवर जवळपास ४० बस धावत असल्या तरी वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. बस येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांतून प्रवास करावा लागतो.प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलेहोते. मात्र, यापूर्वी काय केले हे महत्त्वाचे नसून ज्या ठिकाणी मागणी होते तेथे शहर बससेवा सुरू केली पाहिजे, असे सांगून शहर बससेवेत वाढ करण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची सूचना अध्यक्षांनी केली होती.बससेवेत वाढशुक्रवारपासून चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० आणि शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ शहर बस धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.बसला क्रमांक अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रकाचा फलक, तसेच बसला क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करण्यात आली, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.