शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस
By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:52:53+5:302014-08-01T01:08:14+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे.

शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
शहर बससेवेत वाढ करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी १४ जुलै रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० बसेस सोडण्यात येत असून, दिवसभरात जवळपास १६० फेऱ्या होतील तर शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ बसेस सोडण्यात येणार (दिवसभरात १६८ फेऱ्या) आहेत. दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मार्गांवर जवळपास ४० बस धावत असल्या तरी वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. बस येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, अॅपेरिक्षांतून प्रवास करावा लागतो.
प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले
होते.
मात्र, यापूर्वी काय केले हे महत्त्वाचे नसून ज्या ठिकाणी मागणी होते तेथे शहर बससेवा सुरू केली पाहिजे, असे सांगून शहर बससेवेत वाढ करण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची सूचना अध्यक्षांनी केली होती.
बससेवेत वाढ
शुक्रवारपासून चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० आणि शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ शहर बस धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.
बसला क्रमांक
अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रकाचा फलक, तसेच बसला क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करण्यात आली, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.