शहरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरूच
By Admin | Updated: June 14, 2016 00:08 IST2016-06-13T23:53:47+5:302016-06-14T00:08:38+5:30
औरंगाबाद : शहरात वाहन चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. वाहन चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला

शहरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरूच
औरंगाबाद : शहरात वाहन चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. वाहन चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांत शहरातून १३ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.
हडकोतील भारतमातानगर येथील जगन्नाथ निकम हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी एन-११ येथे गेले असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० सीजे ९०४८) चोरट्यांनी चोरून नेली. ८ जून रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एक घटना सिडकोतील हॉटेल पारू समोर घडली. दीपक ढोणे यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० एएच ४००९) नेहरू गार्डनसमोरील एका हॉटेलजवळ उभी केली होती. ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. शहाबाजार येथील रहिवासी मोबीन खान यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० एएल ७६) चेलीपुरा येथील एका प्रार्थनास्थळाजवळ उभी करून ठेवली होती. ही दुचाकी ८ जून रोजी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. गुलमंडी येथील रहिवासी कमलेश मोतीवाला यांची मोपेड (क्र.एमएच-२० बीपी २२३२) घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली.
यावेळी अनिल बाबूराव पटेल यांची मोपेड (क्र.एमएच-२० सीपी ०९३२) सुपारी हनुमान मंदिर रोडवरील घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. सिटीचौक ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शेख सत्तार यांची दुचाकी चोरट्यांनी रहेमानिया कॉलनी येथून चोरून नेली. सत्तार यांचे भाऊ सय्यद अजमत यांनी दुचाकी (क्र.एमएच-२० बीडी ९३०७) घरासमोर लॉक करून ठेवली होती. सत्तार यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दाखल केली. मयूर वायचाळ यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२० सीजी ४८८६) रेल्वेस्टेशन गेटसमोर उभी करून ठेवली होती. ही दुचाकी ९ जून रोजी चोरट्यांनी चोरून नेली. अन्य एका घटनेत चरण कांबळे यांची दुचाकी उस्मानपुरा भागातील एका विमा कंपनीच्या कार्यालयासमोरून चोरून नेली. ८ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको एन-४ येथील आदिवासी वसतिगृहासमोर उभी केलेली दुचाकी (क्र.एमएच-२० बीजे ५९२७) चोरट्यांनी चोरून नेली. कृष्णा वाघ या विद्यार्थ्याने याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
छत्रपतीनगर येथील संजय बलांडे यांची दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. बलांडे यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हीनानगर येथील इम्रान अखलाख सय्यद यांची दुचाकी चोरट्यांनी पळविली.