शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील एटीएम ‘रामभरोसे’

By admin | Updated: February 4, 2015 00:39 IST

संजय कुलकर्णी / गजेंद्र देशमुख, जालना विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र सोमवारी मध्यरात्रीनंतर ‘लोकमत’ टीमने

संजय कुलकर्णी /गजेंद्र देशमुख, जालनाविविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र सोमवारी मध्यरात्रीनंतर ‘लोकमत’ टीमने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. शहरातील एटीएम फोडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ४० पैकी २५ एटीएम केंद्रांना भेट दिल्यानंतर यापैकी २० केंद्रे असुरक्षित असल्याचे आढळून आले.रात्री १२.१७ वाजता रेल्वेस्थानक मार्गावरील गांधीचमन येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नव्हता. केंद्रासमोर अंधार होता. या केंद्रापासून शंभर फुटावर असलेल्या कॅनरा बँक व युनियन बँकेच्या केंद्रावरही रक्षक दिसून आला नाही. युनियन बँकेचे केंद्राच्या परिसरात पूर्णपणे अंधार होता. याच परिसरातील १२.२५ वाजता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही सुरक्षा नव्हती. या समोरील एचडीएफसीचे केंद्र बंद होते. जुन्या नगरपालिकेसमोरून मस्तगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रामीण बँकेच्या केंद्रातही रक्षकाचा पत्ता नव्हता. १२.३० वाजता महावीर चौकातील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. मात्र याच रांगेतील आयसीआयसीआयच्या केंद्रावर रक्षक निद्रावस्थेत दिसून आला. परंतु आवाज ऐकल्यानंतर या रक्षकाने ‘आपण कोण, काय काम आहे’ अशी विचारणा केली. याच भागातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या केंद्रावर रक्षक गाढ निद्रावस्थेत असल्याचे आढळून आले. १२.३७ वाजता शिवाजीपुतळा भागात सेन्ट्रल बँक त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँकेच्या केंद्रात सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या केंद्रावरही रक्षक दिसला नाही. या रस्त्यावरही अंधार होता. मूर्गीवेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्या व एटीएमच्या समोर दोन सुरक्षारक्षक होते. आमच्या केंद्रावर दररोज सुरक्षा असते, असे त्यांनी सांगितले. १२.५५ वाजता काद्राबाद भागात आयडीबीआयच्या केंद्रावरही सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. देऊळगावराजा रोडवरील याच बँकेच्या केंद्रात मात्र रक्षक होता. १ वाजता बसस्थानक मार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. लक्कडकोट चौकासमोरील भागात अ‍ॅक्सिस बँकेचे केंद्रही रक्षकाविनाच होते. १.०५ वाजता भोकरदन नाक्यावरील स्टेट बँक हैद्राबाद त्यासमोर एचडीएफसी, त्यालगत आयडीबीआय या तिन्ही केंद्रांवरही सुरक्षेचा अभाव होता. काही अंतरावरील एसव्हीसी व कॅनरा बँकेच्या केंद्रावर सुरक्षारक्षक होता. जालना शहरात नवीन व जुना जालना भागात मिळून विविध बँकांचे एटीएम ४० मशीन्स आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच एटीएमवर सुरक्षा रक्षक होते. बहुतांश बँकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर तसेच काही संवेदशील भागातही सुरक्षा रक्षक नाहीत. मोजके एटीएम सोडले तरी बहुतांश ठिकाणी आतील बाजूने सीसीटीव्ही आहेत. काही ठिकाणी मशीनच्या दरवावाज्यांचीही मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. एटीएमवर सुरक्षा रक्षकच नसल्याचे संधी साधत चोरटे मोठा डाव साधण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी.एस. कुतवाल यांना एटीएम केंद्रांच्या असुरक्षिततेविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, शहरात सुमारे ४० एटीएम केंद्रे आहेत. विविध बँकांनी ठराविक एजन्सींकडे या केंद्राचे काम दिलेले आहे. त्यामुळे संबंधित एजन्सींनी या केंद्रांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली पाहिजे. याविषयी आपण संबंधित बँकांना तातडीने सूचना देऊ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच या सुरक्षेच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करू, असेही कुतवाल म्हणाले.