पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत नागरिकांना जनजागृती हवीच
By Admin | Updated: July 21, 2016 00:43 IST2016-07-21T00:43:32+5:302016-07-21T00:43:32+5:30
जालना : गत काही वर्षांत प्लास्टर आॅफ पॅरिसपासून गणेश मूर्ती निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. भाविकही मोठ्या अस्थेने या मूर्तींची पूजा करतात.

पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत नागरिकांना जनजागृती हवीच
कोल्हापूर : महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली.दुपारी एक वाजता लक्ष्मीपुरी येथील श्रमिक भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. लाल झेंडे घेऊन तीनशेहून अधिक पेन्शनर सहभागी असलेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. येथील फाटकासमोर काही काळ निदर्शने करण्यात आली. यानंतर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे, सचिव ए. बी. पाटील, दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
कर्मचारी निवृत्तिवेतन योजना ईपीएस १९९५ च्या अंतर्गत ५२ लाख पेन्शनधारकांनी आयुष्यभर अंशदान दिले आहे. प्रत्येक व्यक्तीचे केंद्र सरकारच्या पेन्शन फंडामध्ये लाखो रुपये जमा आहेत. तरीही पेन्शनरांना केवळ २०० रुपयांपासून २२०० रुपयांपर्यंत पेन्शन मिळत आहे. या संदर्भात संघटनेतर्फे शेकडो आंदोलने करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकार आल्यानंतर ९० दिवसांत हा प्रश्न निकाली काढू, तसेच खोशियारी कमिटीच्या पिटिशन क्र. १४७ अन्वये ३०० रुपये बेसिक पेन्शन व महागाई भत्ता दिला जाईल, असे आश्वासन संघटनेला दिले होते. इतकी रक्कम पेन्शनरांना द्यायला सरकारला काहीच हरकत नाही. तसेच याचा सरकारी तिजोरीवर कोणताही जादा भार पडणार नाही; कारण आमच्या पेन्शन फंडामध्ये साडेतीन लाख करोड रुपये जमा आहेत. त्यामुळे १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर ही मागणी पूर्ण होईल, अशी आशा आम्ही बाळगतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात शिवाजी सावंत, मारुती डोंगळे, शामराव पाटील, राजाराम सुतार, हिंदुराव बागल, रॉबर्ट पन्हाळकर, मोहन कुलकर्णी, अनिल शिंदे, महादेव कोकाटे, बाळासाहेब गायकवाड, सहभागी झाले होते.