शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

By संदीप शिंदे | Published: March 28, 2024 4:51 PM

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...

उदगीर : तालुक्यात गेल्या ३५ वर्षांत केवळ पाच-सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली. तेव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षांच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही.

उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि.मी. एवढे आहे. १९६५ पासून केवळ १३ वर्षेच एक हजार मि.मी.च्या वर पाऊस होऊन तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि.मी. व १९७२ साली केवळ १७९ मि.मी. एवढाच पाऊस झाला होता. ही दोन्ही वर्षे दुष्काळी वर्षे म्हणून प्रसिद्ध होती. १९८६, १९९२, १९९४ सालीही या तालुक्यात ५०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. २००४ साली तालुक्यात ७२४ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्यावर्षी महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात जलपुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली गावे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्या गावात जलपुनर्भरणाचे प्रयोग यशस्वी केले होते. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली होती. मात्र, आता पुन्हा पहिल्यासारखी टंचाईची स्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...शासनाच्या वतीने चार-पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शिवाय उदगीर येथील पाणीदार चळवळीच्या वतीने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण उदगीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती दूर झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त व जलपुनर्भरणाकडे शासनासह सर्वच लोकांनी पाठ फिरवली असल्यामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याच्या पातळ्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

वृक्षारोपण, संवर्धनाचे काम कागदावरच...गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम कागदावरच सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, वाळूचा उपसा, पोखरले जाणारे डोंगर व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. हे अभियान राबविण्यासाठी निकष घालून दिले आहेत. हे निकष वगळून सरसकट गावांतून हे अभियान राबविण्यासाठी सक्ती करावी अशी पाणीदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांची मागणी आहे. पुढच्या काळात जलपुनर्भरणाच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास व पर्यावरणाचा विनाश चालूच राहिल्यास तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानही इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस