नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत-ठाकर
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T13:58:22+5:302015-01-12T14:16:44+5:30
रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत असणार्या विविध नियमांचे पालन नागरिकांनी करावे. स्वयंशिस्त पाळून वाहतूक नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले.

नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत-ठाकर
परभणी: रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत असणार्या विविध नियमांचे पालन नागरिकांनी करावे. स्वयंशिस्त पाळून वाहतूक नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले.
शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे उद््घाटन ११जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे झाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्यामराव हत्तरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, मोटार वाहन निरीक्षक विनोद चौधरी, मेघल अनासणे, तानाजी धुमाळ यांची उपस्थिती होती. ठाकर म्हणाल्या, शहर व जिल्ह्यात सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक गुलाब राठोड, पोलिस विभागाचे अधिकारी, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले./(प्रतिनिधी)