खासगी रुग्णालयांकडे नागरिकांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST2021-07-09T04:04:56+5:302021-07-09T04:04:56+5:30

औरंगाबाद : शहरातील मोफत लसीकरण कधी बंद तर कधी सुरू असल्याने नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. शासनाने खासगी ...

Citizens rush to private hospitals | खासगी रुग्णालयांकडे नागरिकांची धाव

खासगी रुग्णालयांकडे नागरिकांची धाव

औरंगाबाद : शहरातील मोफत लसीकरण कधी बंद तर कधी सुरू असल्याने नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. शासनाने खासगी रुग्णालयांना लसीकरणाचे दर ठरवून दिले असून, शहरातील अनेक रुग्णालयांनी त्यानुसार लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयात ६९ हजार ६०८ जणांनी लस घेतली असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात आत्तापर्यंत चार लाख ७९ हजार ९७६ जणांचे लसीकरण झाले आहे. एक लाख ११ हजार जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. मात्र, सध्या लस उपलब्ध नसल्याने दोन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. मोफत लसीकरण बंद असले तरी खासगी रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेली रक्कम घेऊन लस दिली जात आहे. खासगी रुग्णालये थेट कंपन्यांकडून लस खरेदी करीत असून, शासनाने त्यांच्यासाठी दर ठरवून दिले आहेत. कोविशिल्ड ६३०, कोव्हॅक्सिन १२६० रुपयांना उपलब्ध करून दिली आहे, असे डॉ.पाडळकर यांनी सांगितले.

Web Title: Citizens rush to private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.