पोलीस आयुक्तांसमोर नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:31+5:302021-02-05T04:19:31+5:30
गणेश कॉलनी ते पुंडलिकनगर रस्त्यावर अनधिकृत वाळू आणि विटांचे ठेले आहेत. तेथे काम करणारे मद्यपी लोक महिलांकडे वाईट नजरेने ...

पोलीस आयुक्तांसमोर नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
गणेश कॉलनी ते पुंडलिकनगर रस्त्यावर अनधिकृत वाळू आणि विटांचे ठेले आहेत. तेथे काम करणारे मद्यपी लोक महिलांकडे वाईट नजरेने पाहतात.
विजयनगर येथील देशी दारू दुकानामुळे विजयनगर चौकात सतत मद्यपी उभे असतात. या दुकानाविरोधात परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलन केली. हे दुकान हटविण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.
प्रवासी रिक्षाचालक महिला आणि तरुणींना पाहून टेपरेकॉर्डरचा आवाज वाढवितात. प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालक चौकांचे कोपरे व्यापून टाकतात. त्यांच्यावर कारवाई करावी. दामिनी पथकाची संख्या आणि गस्त वाढवावी.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्षात ५५ पेक्षा अधिक वयाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करा.
उल्कानगरी भागात मंगळसूत्र चोरीच्या घटना सतत घडतात. यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी.
सुनेने माझ्या हक्काच्या घरातून बाहेर काढले. मला माझे घर मिळवून द्या। अशी विनंती ज्येष्ठ नागरिक अंबादास राव यांनी केली.
पुंडलिकनगर रस्त्यावर मध्यरात्री रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर अंकुश लावा.