शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

चिखलात लोळल्यानंतर खडीरोडवर नागरिकांचे उंटावर बसून आंदोलन; महिनाभरापासून यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:59 IST

महिना उलटला, तरी कामाला मुहूर्त लागेना; रस्त्यामधील पाइपलाइन उखडून फेकली

छत्रपती संभाजीनगर : देवळाई येथिल खडीरोडचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महिनाभरापूर्वी चिखल आंदोलन करण्यात आले होते. मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आंदोलनाला यशही आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. रस्ता खोदून अडथळा ठरणारी पाइपलाइन उखडून फेकली. परंतु, महिना उलटूनही खोदलेल्या रस्त्याचे काम जैसे थे आहे. त्यामुळे आता उंटावर बसून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहर प्रमुख दिनेश राजेभोसले यांनी उंटावर बसून रविवारी खडीरोडवर आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणखीन एक प्रयोग महिनाभरातच करावा लागला आहे.

सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्यानंतरही या भागाला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दरवर्षी २० कोटींपेक्षा अधिक कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. देवळाई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून खडीरोड ओळखला जातो. काळ्या मातीचा हा रस्ता ६० फुटांचा व २ किमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती झाल्या आहेत. गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुल, दुकाने, शाळा असल्याने हा रस्ता २४ तास वर्दळीचा आहे. परंतु, या रस्त्यावर साधा मुरूम देखील टाकण्यात आलेला नाही. थोडा पाऊस पडला तरी रस्त्यावरून वाहने चालविणे तर सोडाच पायी देखील चालता येत नाही. डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यासाठी या भागातील नागरिकांनी मनपाकडे पाठपुरावा केला. नुकतेच या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. ४ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम देवळाईतील प्रसिद्ध ठेकेदार करणार आहे. भूमीपूजन होताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते.

रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मे महिन्यात चिखल आंदोलन करत केली होती. त्यानंतर ठेकेदाराने रस्ता खोदला. पावसामुळे रस्त्याचे काम बंद ठेवले असे सांगितले. सध्या रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाला असून नागरिकांना घराबाहेर पडणे ही अवघड झाले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाagitationआंदोलन