शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांचा पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:28 IST

शहरात मागील काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असताना महापालिकेने अनेक वॉर्डांतील पाणीपुरवठा चक्क एका दिवसाने पुढे ढकलला आहे. अनेक वसाहतींना ऐन उन्हाळ्यात सहा आणि सात दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

ठळक मुद्देतक्रारींचा पाऊस : शहरवासीयांच्या संयमाचा बांध फुटला

औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असताना महापालिकेने अनेक वॉर्डांतील पाणीपुरवठा चक्क एका दिवसाने पुढे ढकलला आहे. अनेक वसाहतींना ऐन उन्हाळ्यात सहा आणि सात दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.शुक्रवारी महापालिका मुख्यालयासह पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे पाणी आले नसल्याच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या. पालिकेच्या या ‘जालीम’ धोरणाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारी सकाळीच सिडको एन-५ पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलनही करण्यात आले. मागील काही दिवसांपासून महापालिकेने पाणीपुरवठ्याचा अक्षरश: पोरखेळ लावला असून, मनात येईल त्याप्रमाणे प्रयोग करण्यात येत आहेत. जायकवाडीतून समाधानकारक पाणी येत असतानाही शहरात फक्त नियोजन नसल्याने पाणीपुरवठ्याची वाट लागली आहे. शुक्रवारी दिवसभर नागरिक महापालिका मुख्यालयात दूरध्वनीवर पाणी आले नसल्याची तक्रार करीत होते. पाणीपुरवठा विभागातील बहुतांश अधिकाºयांचे मोबाईल बंद होते. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहेल यांना दिवसभर तक्रारींचा निपटारा करावा लागला. नगरसेविका राखी देसरडा यांच्या वॉर्डात आज पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्याचप्रमाणे बालाजीनगर, भानुदासनगर, पदमपुरा, आकाशवाणी, सिडको एन-५, एन-६ परिसर, टी.व्ही. सेंटर आदी अनेक भागात पाणीच आले नाही. ज्या ठिकाणी पाणी आले ते अपुरे होते. कडक उन्हात पाण्यासाठी कुठे भटकंती करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला होता.टाकीवर जोरदार आंदोलनगुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांना चौैथ्या दिवशीही पाणी न आल्याने सकाळी ६ वाजताच संतप्त नागरिक सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर पोहोचले. त्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला. स्वत: व्हॉल्व्ह फिरवून नागरिकांनी पाणी सोडले. नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या नेतृत्वाखाली दीडशे ते दोनशे नागरिकांनी हे आंदोलन केले. यावेळी एकही अधिकारी हजर नव्हता. कार्यालयाला कुलूप होते तर टँकरचालक टँकर भरून पाणी घेऊन जात होते. त्यामुळे नागरिकांनी टँकरचे पाणी बंद करून त्यांना हुसकावून लावले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी आजच पाणी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. नागरिक तीन तास ठाण मांडून बसले. उपअभियंता पदमे यांनी आज पाणी देणे शक्य नाही, असे सांगितले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी स्वत:च वॉल्व्ह फिरवून कॉलनीला पाणीपुरवठा केला.आज बैठकीचे आयोजनशहरातील पाणीपुरवठ्यावर यापूर्वी सर्वसाधारण सभेत पाच तास मंथन झाले. तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा, असे आदेश सभागृहाने दिले. त्यानंतर पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झाली नाही. उलट पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू झाली आहे. शनिवारी सायंकाळी महापौरांनी पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वसाधारण सभा संपल्यावर ही बैठक होईल.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपातagitationआंदोलन