आॅनलाईन लुटारुंमुळे नागरिकांत भीती
By Admin | Updated: May 23, 2015 00:39 IST2015-05-23T00:29:00+5:302015-05-23T00:39:50+5:30
औसा: तालुक्यातील विविध बँकेच्या एटीएम ग्राहकांना बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून एटीएम पीन घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे लांबविण्यात येत असल्याची चर्चा सुरु असतानाच

आॅनलाईन लुटारुंमुळे नागरिकांत भीती
औसा: तालुक्यातील विविध बँकेच्या एटीएम ग्राहकांना बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून एटीएम पीन घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे लांबविण्यात येत असल्याची चर्चा सुरु असतानाच येथील एका शिक्षकास असाच आॅनलाईन गंडा घालून २४०० रूपये लंपास केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी औसा पोलीस ठाणे व भारतीय स्टेट बँकेच्या औसा शाखेत सदरील ग्राहकाने तक्रार दिली आहे़
औसा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत संजय जगताप यांचे खाते आहे़ १९ मे रोजी त्यांना ९९२२३९७६२० या भ्रमणध्वनीवरून तुमच्या एटीएमचा पीन बदला म्हणून एसएमएस आला़ ते पीन बदलण्यासाठी गेले पण तो बदलला नाही़ त्यानंतर २० मे रोजी ०९५३५२७६८०९ या क्रमांकावरून जगताप यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन आला़ सरांचा फोन लागत नाही, मी भारतीय स्टेट बँकेतून बोलतो असे सांगितले़ त्यावेळी जगताप यांना फोनवरून सांगण्यात आले की,काल तुम्ही पीन नंबर बदलण्यासाठी गेलात पण तो बदलला नाही, असे सांगून ९५३५२७६८०९ या नंबरवरून पीन बदलल्याचा एसएमएस आला़
त्यानंतर २१ मे रोजी संजय जगताप हे एटीएमवर गेले व नवीन पीन वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ पण तो चुकीचा असल्याचे सांगण्यात आले़ पुन्हा जगताप यांनी जुना पीन वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ परंतु, खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले़ त्यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी तुम्ही तुमचा पीन सांगितल्यामुळे तुमचे पैसे गेल्याचे सांगितले़ यासंदर्भात गुरुवारी जगताप यांनी बँक शाखेत व औसा पोलिसात तक्रार दिली़ जगताप यांच्या तक्रारीनंतर आणखीन आठ ते दहा लोकांना असेच मॅसेज आल्याचे कळाले़ मोबाईलवरून थापा मारून पीन नंबर घेण्यात येत आहेत़ यात काहीजण गंडले गेले आहेत़ (वार्ताहर)