पाण्यासाठी नागरिकांचे हाल

By Admin | Updated: August 25, 2014 00:25 IST2014-08-25T00:03:42+5:302014-08-25T00:25:01+5:30

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

Citizens | पाण्यासाठी नागरिकांचे हाल

पाण्यासाठी नागरिकांचे हाल

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपुऱ्या पाण्यामुळे भर पावसाळ्यातही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
आयएसओ नामांकनाचे बिरुद लावून मिरविणारी जोगेश्वरी ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. पाणीपट्टी वसूल करणारे प्रशासन नागरिकांना महिन्यातून केवळ ८ दिवसच पाणीपुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी जोगेश्वरी वसाहतीतील आंबेडकरनगर, न्यू आंबेडकरनगर, गौतमनगर भागांसह मूळ गावाला चार दिवसांआड सोडले जाते, तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पायपीट करावी लागते. एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीच्या खड्ड्यातून नागरिकांना पाणी आणावे लागते. पाण्यासाठी कामधंदे सोडून कंपनीच्या गेटवर व नळावर महिलांना व लहान मुलांना तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अनेकांना कामाला दांडी मारावी लागते.
ग्रामपंचायतीची मनमानी
पाणीपट्टीच्या निकषानुसार दररोज नळाला पाणी येणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत महिन्यातून आठच दिवस पाणी देते आणि संपूर्ण महिन्याची पाणीपट्टी सक्तीने वसूल करते. हा अन्याय आहे. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची नियमबाह्य मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असल्याचे प्रवीण दुबिले यांनी सांगितले.
ग्रा.पं.ने सर्वांना पाणी द्यावे
मीना पनाड म्हणाल्या, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करते. मात्र, पुरेसे पाणी देत नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रोजगार बुडवून पाणी भरावे लागते. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. त्यांनी ती पार पाडावी.
पाईपलाईनचे काम सुरू
पाणीपट्टी ही वार्षिक आकारणी आहे. एमआयडीसीकडून जेवढे पाणी मिळते. तेवढे पाणी आम्ही नागरिकांना देतो. सध्या जलवाहिनीचे काम सुरूअसल्याने पाण्याची अडचण भासत आहे; परंतु काम पूर्ण होताच सुरळीत पाणी मिळेल.जोगेश्वरीचे ग्रामविकास प्रकाश तुपे अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.