सिटी क्लबचे होणार नूतनीकरण
By Admin | Updated: December 18, 2015 23:49 IST2015-12-18T23:37:10+5:302015-12-18T23:49:15+5:30
औरंगाबाद : शहरात ८० वर्षांपूर्वी निजामाने बांधलेल्या सिटी क्लबचे नूतनीकरण करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे.

सिटी क्लबचे होणार नूतनीकरण
औरंगाबाद : शहरात ८० वर्षांपूर्वी निजामाने बांधलेल्या सिटी क्लबचे नूतनीकरण करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. शहरातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यापारी सदस्य असलेल्या आमखास मैदानाजवळील त्या क्लबची उपजिल्हाधिकारी व पथकाने शुक्रवारी पाहणी केली. सिटी क्लबमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही पाहणी असल्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.
सिटी क्लब प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष झाले. शहरातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक त्या क्लबचे सदस्य आहेत. क्लबमध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, लॉन टेनिसचे दोन कोर्ट असून करमणुकीसाठी वेगळे दालन आहे. तेथे राहण्याची व्यवस्था, भोजनालय सुरू करण्याचा सदस्यांचा विचार आहे. क्लबच्या सुधारणेसाठी उपजिल्हाधिकारी कटके, संगीता सानप, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे, सा. बा.चे उपअभियंता के. टी. वाघ यांचे पथक स्थापन केले आहे.