मुद्रांक कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST2017-11-16T23:33:39+5:302017-11-16T23:33:46+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शुकशुकाट पहावयास मिळाल्याचे चित्र लोकमतच्या स्टिंग आपरेशनमध्ये दिसून आले.

मुद्रांक कार्यालयात शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शुकशुकाट पहावयास मिळाल्याचे चित्र लोकमतच्या स्टिंग आपरेशनमध्ये दिसून आले. येथील अधिकाºयाकडे परभणी येथील पदभार असून रिक्त पदेही भरली नाहीत. त्यामुळे नेहमीच हे चित्र असते, अशा तक्रारी आहेत.
मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. कार्यालयात एक प्रभारी अधिकारी व दोन कर्मचारी तसेच एक शिपाई अशी पदे भरलेली आहेत. मागील सात महिन्यांपासून कार्यालय कार्यान्वीत असून अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यालयीन कामे वेळेत होत नसल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले.