शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

सर्कलमधील पुढाऱ्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

By admin | Updated: October 9, 2014 00:37 IST

भूम : शहरासह तालुक्यातील ईट, पाथरुड, माणकेश्वर, वालवड, अंबी या मोठा गावातून मतदान खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून स्पर्धा सुरू झाली आहे.

भूम : शहरासह तालुक्यातील ईट, पाथरुड, माणकेश्वर, वालवड, अंबी या मोठा गावातून मतदान खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून स्पर्धा सुरू झाली आहे. किंबहुना यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर असल्याने या सर्कलमधील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्यात ईट सर्कलमध्ये जि. प. सदस्य राजाभाऊ हुंबे व पं. स. सदस्य शिवाजी जालन हे राष्ट्रवादीचे असल्याने सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा असला तरी काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब देशमुख यांचाही मतांचा मोठा जनाधार असल्याने त्यांच्या ईटमध्ये मताधिक्य घेण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. ईटमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब चव्हाण यांच्याकडे ग्रामपंचायत असल्याने येथील ६ हजारावर मतदानाचा कल कोणाला मिळतो, याची उत्सुकता लागून आहे. माणकेश्वर गावातून ३ हजार ८६५ मतदार संख्या आहे.यात पुरुष २०८८ तर महिला मतदारांची १७७७ एवढी संख्या आहे. या सर्कलच्या जि. प. सदस्या राष्ट्रवादीच्या मीना सूळ तर पं. स. च्या सदस्या सुनिता पालके व पं. स. सदस्या काकडे या राष्ट्रवादीच्या आहेत. या सर्कलची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने आ. राहुल मोटे यांची मते घेण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे रासपकडून निवडणूक लढवित असलेले बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना मानणारा वर्गही असल्याने मतदान मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे. भूम तालुक्यातील पाथरूड या ३२२७ मतदारांच्या गावात १७५० पुरुष व १४७७ महिला मतदार आहेत. राकाँचे उपसभापती रामकिसन गव्हाणे यांचा हा बालेकिल्ला असल्याने या भागाचे जि. प. सदस्य सुनील भोईटे हेही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र सेनेला व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनाही मानणारा गट येथे असल्याने येथून मतदान खेचण्यासाठी स्पर्धा आहे. शिवाय पाथरूड ग्रामपंचायत काँग्रेसच्या प्रा. तानाजी बोराडे यांच्याकडे असल्याने अ‍ॅड. नुरोद्दीन चौधरी यांनीही या संघातून मते मिळविण्यासाठी चुरस वाढविली आहे. वालवड येथे २२७६ इतके मतदान आहे. १२१४ पुरुष तर १०६२ महिला मतदार आहेत. येथे नवनिर्वाचित जि. प. बांधकाम सभापती दत्ता मोहिते यांनी सेनेसाठी तगडी फिल्डींग लावली आहे. तर वालवड ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे असल्याने सरपंच सुनील पाटील यांच्यासह प्रवीण खटाळ, अजित इंदलकर, लता विभुते ह्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ असल्याने मते मिळविण्यासाठी चुरस वाढविली आहे. भूम तालुक्यातील अंबी हेही मोठे गाव असून, सभापती अण्णा भोगील यांचा बालेकिल्ला आहे. २२२७ मतदार असलेल्या गावातून १२४६ पुरुष तर ९८१ महिला मतदार आहेत. येथे काँग्रेसच्या स्रेहप्रभा पाटील यांचाही दबदबा असून भाजपाचे अंगद मुरूमकर हेही बाळासाहेब पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागणार आहे. प्रमुख पक्षांसह दहा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. (वार्ताहर)