सिटीस्कॅन दुरूस्तीचा प्रस्ताव गुलदस्त्यात
By Admin | Updated: July 7, 2016 23:30 IST2016-07-07T23:28:35+5:302016-07-07T23:30:54+5:30
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरूस्त आहे. यंत्राचा मुख्य पार्टमध्ये बिघाड झाल्याने सिटीस्कॅन बंद आहे.

सिटीस्कॅन दुरूस्तीचा प्रस्ताव गुलदस्त्यात
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरूस्त आहे. यंत्राचा मुख्य पार्टमध्ये बिघाड झाल्याने सिटीस्कॅन बंद आहे. दुरूस्तीसाठी जिल्हा रूग्णालयातर्फे प्रस्ताव पाठविलेल्या प्रस्तावास वरिष्ठांकडून अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यामुळे सुविधा असूनही रूग्णांची गैरसोय होत आहे.
रूग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन यंत्र आले. परंतु ते नादुरूस्त झाल्याने ऐनवेळी रूग्णांना सुविधांअभावी नांदेडकडे रेफर करण्याचे प्रमाण वाढले. याबाबत विविध संघटनांनी दुरूस्तीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदने दिली. परंतु त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावास वरिष्ठांकडून मान्यता मिळाली नाही.
विशेष म्हणजे या विभागात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे इतर डॉक्टरांवरच काम भागविले जात असल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांतून सांगितले जात आहे. या ताळमेळात लाखो खर्चूनही सिटीस्कॅन यंत्र धूळ खात आहे. अतिगंभीर रूग्ण, अपघातातील जखमींना यंत्रातील बिघाडामुळे उपचारासाठी बाहेरील जिल्ह्यात पाठविले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐनवेळीच रूग्णांची गैरसोय होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)