घाटीतील सीव्हीटीएसमध्ये होतात केवळ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी

By Admin | Updated: September 29, 2014 00:46 IST2014-09-29T00:46:10+5:302014-09-29T00:46:10+5:30

औरंगाबाद : घाटीतील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस) केवळ अँजिओग्राफी, टुडी इकोसारख्या तपासण्या आणि अँजिओप्लास्टीपुरताच मर्यादित राहू लागला आहे.

Cigarettes in the valley are only angiography, angioplasty | घाटीतील सीव्हीटीएसमध्ये होतात केवळ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी

घाटीतील सीव्हीटीएसमध्ये होतात केवळ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी

औरंगाबाद : घाटीतील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस) केवळ अँजिओग्राफी, टुडी इकोसारख्या तपासण्या आणि अँजिओप्लास्टीपुरताच मर्यादित राहू लागला आहे. या विभागाचा दुसरा उरोशल्यचिकित्सा विभाग सर्जनअभावी बंद पडला आहे. तेथील आॅपरेशन थिएटरमधील उपकरणांना गंज चढू लागला आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख. घाटीत मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकार आता केवळ श्रीमंताचाच आजार राहिला नाही. कष्टकरी, झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तींनाही हृदयविकार होत आहे. हा विकार असलेले गरीब रुग्ण उपचारासाठी घाटीत दाखल होतात.
घाटीत फक्त रुग्णांची अँजिओग्राफी, टुडी इको आदी तपासण्या केल्या जातात. त्यासाठी तेथे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष देशमुख, डॉ. अजित भागवत कार्यरत आहेत. डॉ. देशमुख, डॉ.भागवत आणि सीव्हीटीएसमधील निष्णात पॅरामेडिकल स्टाफ यांच्यामुळे हृदयरोग विभागाचे कामकाज नियमित सुरू असल्याची माहिती सहयोगी प्रा. डॉ. एस. जी. राऊत यांनी दिली. डॉ. राऊत म्हणाले की, सीव्हीटीएसमध्ये आठवड्यातून तीन दिवस अँजिओग्राफी करण्यात येतात. दरमहा साधारणपणे ६० ते ७० रुग्णांची अँजिओग्राफी केली जाते. शिवाय रुग्णांच्या प्रकृतीचे निदान झाल्यानंतर त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये किती अडथळे आहेत, तसेच त्यास अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे अथवा बायपाससारख्या सर्जरीची गरज आहे, याबाबतचे निदान होते. आठ दिवसांतून तीन दिवस रोज रुग्णांवर अँजिओप्लास्टी करावी, अशा सूचना डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नियमित अँजिओप्लास्टी होत असल्याचे डॉ.राऊत म्हणाले. ज्या रुग्णांना बायपास सर्जरी करण्याची गरज आहे आणि ज्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घ्यावयाचे आहेत, त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. तेथेही त्यांना या योजनेंतर्गत उपचार मिळतात.

Web Title: Cigarettes in the valley are only angiography, angioplasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.