सिडकोत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:14 IST2019-06-24T22:14:08+5:302019-06-24T22:14:20+5:30

नागरी वसाहत भागात ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असून नागरिकांच्या घरासमोर साचत आहे.

Cidkot drainage water on the road | सिडकोत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

सिडकोत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

वाळूज महानगर: सिडकोतील साक्षीनगरी नागरी वसाहत भागात ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असून नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. ड्रेनेजच्या या पाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाने चेंबर दुरुस्त करुन दुर्गंधीतून सुटका करावी अशी मागणी येथील विजय कोल्हे, दिलीप अट्रावलकर, माधव हादवे, बाबासाहेब सामृद्ध, भगवान जाधव, सचिन देशमुख, पंकज पवार, जितेंद्र चव्हाण आदींनी केली आहे.

Web Title: Cidkot drainage water on the road