सिडको करणार औषध व धूरफवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 21:43 IST2019-02-05T21:43:21+5:302019-02-05T21:43:34+5:30
प्रशासनाने औषध व धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको करणार औषध व धूरफवारणी
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील नागरिकांची दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावातून सुटका व्हावी, यासाठी प्रशासनाने औषध व धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.
सिडको वाळूज महानगरात अस्वच्छता हेच आजाराचे मूळ कारण असल्याने प्रशासनाने स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. वर्षभरात केवळ दुर्गंधी व डास निर्मूलनासाठी १४ लाख ५,८०० रुपये खर्च केले जाणार आहेत. यातून महानगर १, २, ४ व उर्वरित ७५ टक्क्यांवरील नागरी वसाहतीत औषध व धूरफवारणी करण्यात येणार आहे.
यासाठी पाच संस्थांनी निविदा भरली आहे. यातून एकीची निवड करून प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.