शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सिडको येणारच..!

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

जालना : सिडकोच्या रूपाने जुळे शहर उभारण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

जालना : सिडकोच्या रूपाने जुळे शहर उभारण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शहरात सिडको आणण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. सिडकोचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी नवीन प्रस्तावासाठी दोन ठिकाणी जागांची पाहणीही करण्यात आल्याचे समजते. नागेवाडीचा प्रस्ताव आता मागे पडला असून नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. औद्योगिकीकरण आणि वाढते शहर विचारात घेता सिडकोला मोठी संधी आहे. जालना शहराची ‘अमीबा’ सारखी होणारी वाढ नागरीसुविधांच्या मुळावर आली आहे. ही बाब विचारात घेऊन पालकमंत्री राजेश टोपे यांनी नगर विकास राज्यमंत्री असताना नऊ वर्षांपूर्वी नागेवाडी शिवारात सिडको वसाहत निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांनी औद्योगिक पट्ट्यात निवासस्थाने उभारण्यास तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ही वसाहत आडगळीत पडली आहे. अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर जागा मालकांना पैसे देण्यासाठी तरतूदही केली होती. ही रक्कम उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर असतांना सर्वकाही ठप्प झाले. आठ दिवसांपूर्वी सिडकोचा आढावा घेण्यात आला.मंठा आणि अंबड मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. औरंगाबाद मार्गावर शेतकऱ्यांचा वाद असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिवाय ही जागा पूर्णत: प्रदूषणाच्या विळख्यात आहे. चंदनझीरा आणि नागेवाडी हा परिसर धुरामुळे त्रस्त आहे. त्यामुळे या भागात नवीन वसाहतीची उभारणी धोक्यात आली आहे.(वार्ताहर)येत्या १० ते १२ दिवसांत ठोस निर्णय अपेक्षित मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, येत्या १० ते १२ दिवसात सिडकोचा ठोस निर्णय होणार आहे. आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही. दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणती जागा निवडली जाणार याचाही निर्णय समोर येईल. सिडकोची वसाहत तळ्यात-मळ्यात सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुनील केंद्रेंकर रूजू झाले आहेत. त्यांनी दोन जागांची पाहणी केली. अजूनही ठोस निर्णय झाला नसला तरी नवीन व सर्वसुविधांनी युक्त असे नवीन शहर नावारूपास येण्याची जालनेकरांची इच्छा प्रत्यक्षात उतरणार आहे.