सिडको वाळूज महानगरावर जलसंकट

By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:54+5:302020-12-02T04:11:54+5:30

वाळूज महानगर : एमआयडीसीकडून सिडकोला दररोज जवळपास ५ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, आजघडीला सिडको वाळूज महानगरात ...

CIDCO water crisis in Waluj metropolis | सिडको वाळूज महानगरावर जलसंकट

सिडको वाळूज महानगरावर जलसंकट

वाळूज महानगर : एमआयडीसीकडून सिडकोला दररोज जवळपास ५ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, आजघडीला सिडको वाळूज महानगरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असूनही नियोजनअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील जलसंकट दूर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरात सिडकोच्या वतीने दोन जलकुंभ उभारले आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत दोन्ही जलकुंभ अपुरे पडत आहेत. आजघडीला सिडको परिसरात दोन दिवसांआड जवळपास एक तास पाणी पुरवठा केला जातो. या भागातील राज स्वप्नपूर्ती व आदर्श कॉलनी या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उन्हाळ्यात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात देवगिरी नदीला पूर आल्यामुळे जलवाहिनी वाहून गेली आहे. सध्या टँकर व जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत असल्याचे सुशांत चौधरी, अनिल मालोदे, प्रकाश जाधव, गंगाराम मालकर, गणेश धाडवे, प्रिया डोके, मंगल शिंदे, रुपाली झुरंगे, प्रतिभा डोसे यांनी सांगितले.

सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक हिवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगितले.

वडगावात होतेय पाणीचोरी

वडगावातील नागरिकांकडून सिडकोच्या जलवाहिनीवरुन पाणीचोरी केली जात असल्याचा आरोप सिडकोतील नागरिकांनी केला आहे. अशातच सिडकोच्या संचालक मंडळाने वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव घेतला असून शासनाकडून अद्यापपर्यंत या ठरावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. मात्र सिडको विकास कामाची जबाबदारी झटकत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर आहे.

Web Title: CIDCO water crisis in Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.