शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

वाळूज महानगरातील सिडकोचे भूखंड सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; किमतीत झाली दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:13 PM

वाळूज महानगरात सिडकोने भूखंड विक्रीला काढले असून, नवीन सुधारित अहवालानुसार भूखंडांच्या राखीव दराच्या  किमतीत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. भूखंडाचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना सिडकोत घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे.

ठळक मुद्देसिडको प्रशासनाने नुकतेच सिडको वाळूज महानगर १, २, ४ व २५ टक्के पॉकेटमधील निवासी, व्यावसायिक वापरासाठी भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. सिडकोतील भूखंडांच्या मागील वर्षी राखीव दराच्या किमती ७ हजार ५०० रुपये प्रति चौ.मी. एवढ्या होत्यासिडको प्रशासनाने वाळूज प्रकल्पाचा अहवाल सुधारित केला आहे. या नवीन अहवालानुसार भूखंडाची राखीव किंमत १४ हजार ५१० रुपये प्रति चौ.मी. एवढी निश्चित करण्यात आली आहे.

- अशोक कांबळे 

वाळूज महानगर (औरंगाबाद) : वाळूज महानगरात सिडकोने भूखंड विक्रीला काढले असून, नवीन सुधारित अहवालानुसार भूखंडांच्या राखीव दराच्या  किमतीत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. भूखंडाचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना सिडकोत घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे सिडकोचे भूखंड केवळ श्रीमंतांसाठीच असून, सर्वसामान्यांना त्यात कसलेही स्थान नसल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. 

सिडको प्रशासनाने नुकतेच सिडको वाळूज महानगर १, २, ४ व २५ टक्के पॉकेटमधील निवासी, व्यावसायिक वापरासाठी भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. नगर १ मधील २५ टक्के पॉकेटसह १२ भूखंड, नगर २ मधील ४ भूखंड आणि नगर ४ मधील तब्बल २८० भूखंड असे एकूण २९६ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. सिडकोतील भूखंडांच्या मागील वर्षी राखीव दराच्या किमती ७ हजार ५०० रुपये प्रति चौ.मी. एवढ्या होत्या; परंतु सिडको प्रशासनाने वाळूज प्रकल्पाचा अहवाल सुधारित केला आहे. या नवीन अहवालानुसार भूखंडाची राखीव किंमत १४ हजार ५१० रुपये प्रति चौ.मी. एवढी निश्चित करण्यात आली आहे. राखीव दराच्या १५० टक्के दर निवासी वापराच्या भूखंडाकरिता, तर २०० टक्के दर निवासी व व्यापारी भूखंडाकरिता आकारण्यात आला आहे.

प्रशासनाने भूखंडाच्या राखीव दराच्या किमतीत दुपटीने वाढ केली आहे. या अहवालात सिडकोने सर्वसामान्य जनतेचा कुठेही विचार केलेला नाही. बाजारभावापेक्षाही हे भाव अधिक आहेत. त्यामुळे गरिबांना घर खरेदी करणे शक्यच नाही. विशेष म्हणजे या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अगोदरच नोटाबंदीमुळे जमीन, प्लॉट, फ्लॅट आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सिडकोच्या सुविधा चांगल्या असल्याने सिडकोत आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते; पण  किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. सर्वसामान्यांना घरे मिळावीत हे सिडकोचे धोरण आहे; मात्र सिडकोने भूखंडाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून आपल्याच धोरणाला हरताळ फासला आहे. धनदांडग्यांना पोषक धोरण राबवीत असल्याने सिडकोच्या कारभाराविषयीच शंका निर्माण झाली आहे.  यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

एफएसआयचा डबल भुर्दंड सिडको ग्रोथ सेंटरमधील भूखंडाला १.५ एफएसआय चटई क्षेत्र निर्देशांक एवढा आहे. मात्र सिडकोने हे भूखंड १ एफएसआयचा दर आकारून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. भूखंड खरेदी केलेल्या व्यक्तीला भविष्यात .५ एफएसआय वापरात आणावयाचा असल्यास त्या व्यक्तीला पुन्हा .५ एफएसआयची किंमत सिडको प्रशासनाला भरावी लागणार आहे. म्हणजेच नागरिकांवर .५ एफएसआयचा डबल भुर्दंड बसणार आहे. 

धनदांडग्यांच्या घशात भूखंड घालण्याचा डाव सिडकोने दुपटीने भूखंडाच्या किमती वाढविल्या असून, बाजारभावापेक्षादेखील ही किंमत जास्त आहे. इच्छा असूनही दर जास्त असल्याने प्लॉट विकत घेणे शक्य नसल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधुरे राहणार आहे. सिडकोने हे धोरण म्हणजे पद्धतशीरपणे धनदांडग्यांच्या घशात भूखंड घालण्याचा डाव आहे, असे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वर्पे यांनी सांगितले.- दत्तात्रय वर्पे

सोडत पद्धतीने भूखंड विक्री करावी सर्वसामान्यांना घर मिळावे असे सिडकोचे धोरण असून, यापूर्वी सोडत पद्धतीने घराची विक्री केली आहे; परंतु या भूखंड विक्रीत सर्वसामान्य नागरिकांचा कुठेही विचार केला गेला नाही. भूखंडाच्या वाढीव दरावरून सिडकोने धंद्याचे दुकान मांडले की काय, अशी शंका येत आहे. निविदा पद्धतीत केवळ श्रीमंतांचा लाभ होतो. त्यामुळे सिडकोने निविदा पद्धत बंद करून सोडत पद्धतीने भूखंडांची विक्री करावी, असे काँग्रेसचे अर्जुन आदमाने यांनी सांगितले.

- अर्जुन आदमाने

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबाद