जलवाहिनी न टाकता सिडकोने केली नागरिकांची फसगत

By Admin | Updated: July 3, 2014 00:57 IST2014-07-03T00:51:36+5:302014-07-03T00:57:17+5:30

विकास राऊत , औरंगाबाद सिडको झालर क्षेत्रविकास आराखड्यातून माघार घेत असल्यामुळे एकप्रकारे जनतेचे नुकसान होणार आहे.

CIDCO fraudulently made citizens irresponsible | जलवाहिनी न टाकता सिडकोने केली नागरिकांची फसगत

जलवाहिनी न टाकता सिडकोने केली नागरिकांची फसगत

विकास राऊत , औरंगाबाद
सिडको झालर क्षेत्रविकास आराखड्यातून माघार घेत असल्यामुळे एकप्रकारे जनतेचे नुकसान होणार आहे. १९७२ मध्ये जेव्हा सिडकोने शहरात मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी नागरिकांना पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाने दिले होते. मात्र, ३४ वर्षे सिडकोने नागरिकांना झुलवत ठेवून मनपाकडे हस्तांतरण केले. २००६ साली झालेल्या हस्तांतरणामुळे ३२ हजार मालमत्ताधारकांची एकप्रकारे फसगतच झाली आहे. सिडको-हडकोवासीयांना पाण्यासाठी मनपाकडे भांडण्याची वेळ अलीकडच्या काळामध्ये वारंवार येत आहे. हस्तांतरणानंतर २२ वॉर्डांच्या सिडको-हडको परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे सुविधांची वानवा आहे. याप्रकरणी सिडको प्रशासनाला विचारले असता अधिकाऱ्यांनी हात वर करू न मुख्यालयाकडे बोट दाखविले.
सिडकोच्या निर्मिती वेळी
सिडकोने १०० घरांची सुरुवातीला निर्मिती केली. घरांसाठी ३ इंच जलवाहिनी देण्याचे ठरले होते. हळूहळू जशी घरे वाढली तशी पाणीपुरवठ्याची मागणी सुरू झाली. त्यानंतर ५०० घरांसाठी ६ इंची जलवाहिनी टाकण्यात आली. दिल्लीगेट येथे पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला. नांदेड, पनवेल, बेलापूर, वाशी या शहरांमध्ये पाण्याचे स्रोत सिडकोने दिले. मात्र, औरंगाबादेत सिडकोेने पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था केली नाही. २४ तास पाणीपुरवठा करू, असा सिडकोने शब्द दिला होता. हस्तांतरण करतानाही कुणी त्याबाबत बोलले नाही. हस्तांतरणाची एकतर्फी प्रक्रिया पार पडली. एमआयडीसीकडून सिडकोने नागरिकांना पाणी पुरविले; पण येथून जाताना सिडकोने पाण्याचा स्रोत निर्माण केला नाही.
सिडकोची पाण्याची गरज
सिडको-हडकोसाठी २००१ मध्ये टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीचे २० एमएलडी म्हणजेच २० लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे.
नक्षत्रवाडी एमबीआर येथे एक्स्प्रेस जलवाहिनीवर लावण्यात आलेल्या वॉटरमीटरनुसार ४२ एमएलडी पाण्याची नोंद होत आहे.
मुळात एन-५ च्या जलकुंभापर्यंत फक्त २२ एमएलडी पाणी येत असल्यामुळे सिडको-हडकोला पाणीपुरवठा होत नाही. सिडको-हडकोला ३५ एमएलडी पाण्याची गरज आहे.
६०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकलीच नाही
६०० मि. मी. व्यासाची स्वतंत्र एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्याचा शब्द सिडकोने नागरिकांना दिला होता. मात्र, सिडकोने ती जलवाहिनी टाकली नाही. शिवाय पाण्याचा स्वतंत्र स्रोतही निर्माण केला नाही. अंतर्गत जलवाहिन्या सिडकोने टाकल्या आहेत. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सिडकोने करणे गरजेचे होते. ४० ते ५० एमएलडी पाणी सिडकोने उपलब्ध करून दिले असते तर आजघडीला शहर व सिडको, अशी भांडणे झाली नसती.
- एच. आर. ठोलिया,
सेवानिवृत्त अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
अनियमित पाणीपुरवठा
जुन्या जलवाहिन्यांवरूनच आजही पाणीपुरवठा सुरू आहे. २००१ मध्ये टाकण्यात आलेली एक्स्प्रेस जलवाहिनीही अपुरी पडते आहे. दोन दिवसाआड अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे वॉर्ड ‘ब’ कार्यालयावर नागरिकांच्या शिष्टमंडळांच्या तक्रारींचा वर्षाव होतो आहे. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या कामावरून एन-७ येथील कार्यालयाला नागरिकांनी कुलूप ठोकले.

Web Title: CIDCO fraudulently made citizens irresponsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.