सिडकोत ड्रेनेजचे पाणी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:03 IST2021-04-04T04:03:57+5:302021-04-04T04:03:57+5:30
अनिरुद्ध कळकुंबे यांना पुरस्कार वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शिक्षक तथा शिक्षक सेनेचे पश्चिम तालुकाध्यक्ष अनिरुद्ध कळकुंबे यांना ...

सिडकोत ड्रेनेजचे पाणी उघड्यावर
अनिरुद्ध कळकुंबे यांना पुरस्कार
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शिक्षक तथा शिक्षक सेनेचे पश्चिम तालुकाध्यक्ष अनिरुद्ध कळकुंबे यांना नाशिकच्या निर्वाण फाउंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल कळकुंबे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आले.
--------------------
अंशत: लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक त्रस्त
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात शनिवार व रविवारी अंशत: लॉकडाऊनची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. या लॉकडाऊनमुळे हातगाडी तसेच रस्त्यावर विविध व्यवसाय करणाऱ्यांना अर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. दोन दिवस व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्यामुळे व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आर्थिक नुकसान होत असल्याची ओरड शेख मन्सूर, समाधन बडे आदींनी केली आहे.
-------------------------------
वाळूज महानगरातील प्रवाशांची लूट
वाळूज महानगर : वाळूजमहानगरातील मनपाची शहर बससेवा आठवडाभरापासून बंद असल्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, काळी-पिवळी आदीं वाहनातून प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनचालक प्रवाशाकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करून लूट करीत असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.
------------------
तीसगाव- वडगाव रस्त्यावर खड्डे
वाळूज महानगर : तीसगाव-वडगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाळूज उद्योगनगरीतून शहरात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर कामगार, वाहनधारक व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्याची दयनीय आवस्था झाल्याने वाहनधारकांना पंढरपूरमार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे.
-----------------------