मनपात काँग्रेसकडून ‘स्वीकृत’ची नाताळ भेट

By Admin | Updated: December 21, 2014 00:10 IST2014-12-21T00:04:08+5:302014-12-21T00:10:00+5:30

लातूर : लातूर शहर महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी डॉ़ प्रभुदास दुप्ते यांना संधी देऊन काँगे्रसकडून त्यांना नाताळची भेट देण्यात आली आहे़

A Christmas gift from 'Approved' by Congress at Manmad | मनपात काँग्रेसकडून ‘स्वीकृत’ची नाताळ भेट

मनपात काँग्रेसकडून ‘स्वीकृत’ची नाताळ भेट


लातूर : लातूर शहर महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी डॉ़ प्रभुदास दुप्ते यांना संधी देऊन काँगे्रसकडून त्यांना नाताळची भेट देण्यात आली आहे़ तर स्थायी समितीवर सदस्यपदी डॉ़ विजय अजनीकर व शाहेदाबी शेख यांची निवड करण्यात आली आहे़ स्वीकृत सदस्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यावर छाननीसाठी जवळपास १ तास लागल्याने डॉ़ दुप्ते यांचा अर्ज बाद होणार, अशीच चर्चा सभागृहात रंगली होती़ मात्र, तासाभरात मनपाच्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचे आढळून आल्यावर आयुक्तांनी प्रभुदास दुप्ते यांच्या नावाची घोषणा केली़
दरम्यान, निवडीनंतर ख्रिश्चन समाज बांधवांच्या वतीने डॉ़ प्रभुदास दुप्ते यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी ढोल ताशांचा गजर करीत त्यांच्या समर्थकांनी मनपा आवारात आनंद साजरा केला़ यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाजबांधव उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: A Christmas gift from 'Approved' by Congress at Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.