शनिवारची सायंकाळ ख्रिसमस कार्निव्हलने रंगवली
By Admin | Updated: December 22, 2014 00:07 IST2014-12-22T00:07:44+5:302014-12-22T00:07:44+5:30
औरंगाबाद : नाताळचा सण आणि हिवाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ख्रिसमस कार्निव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

शनिवारची सायंकाळ ख्रिसमस कार्निव्हलने रंगवली
औरंगाबाद : नाताळचा सण आणि हिवाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ख्रिसमस कार्निव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात टीव्ही स्टार गिरीश जैन यांनी मुलांमध्ये त्यांच्यातीलच एक होऊन आनंद लुटला. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.
शनिवारी सायंकाळी कॅम्पस क्लबचे सदस्य असलेली मुले- मुली मोठ्या संख्येने जमली. क्वॉईन इन द रिंग, हूपला, कलरफुल मॅट्स, फीड द क्लाऊन, फुटबॉल टॉस, लक बाय चान्स, मार्बल अँड स्पून, लॉक अँड की, मिरर रायटिंग, मेक युवर ओन कप केक, मेक युवर ओन नेमप्लेट, आयपॉड प्ले, एम द नंबर्ड कॅन्स, नॉटिंग द मार्बल, बालिंग अॅली, पॉटर, लाख बँगल्स, कॅरी कॅचर, मेंदी, टॅटू, करा ओके, क्लिक युवर ओन पिक्चर, वी गेम्स, एक्स बॉक्स, असे कितीतरी मनोरंजक गेम शोजबरोबर थ्रीडी चित्रपटाचाही मनमुराद आनंद बच्चे कंपनीने घेतला.
सोबतच जादूगारांनी जादूचे विलक्षण प्रयोग सादर करून कॅम्पस क्लब सदस्यांना चकित केले. शहरातील विविध नृत्य संचांनी ‘इंडियावाले’, ‘इश्कजादे’ व ‘मेरी किस्मत’ सारख्या लोकप्रिय गाण्यांवर दिलखेचक नृत्य सादर करून उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. ‘जय हो’ या गीतावर शाळेच्या वाद्यवृंद पथकाने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.
या कार्यक्रमाचे संचालक आदित्य लोहना म्हणाले की, कृतीतून शिक्षण या उक्तीवर आमचा विश्वास असून ते रुजविण्याच्या दृष्टीनेच कार्यक्रम आयोजित केला गेला.
उज्ज्वल शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने मनोरंजन, क्रीडा, साहस यातून शालेय शिक्षणाला हातभार कसा लागेल याचा विचार करूनच कार्यक्रम सादर केले गेले. त्यास मुला- मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विनय शर्मा व दिव्या यांनी या रंगतदार कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.