मनोरंजनाची पर्वणी ‘ख्रिसमस कार्निव्हल’
By Admin | Updated: December 19, 2014 01:00 IST2014-12-19T00:18:15+5:302014-12-19T01:00:52+5:30
औरंगाबाद : मैदानात छान सजविलेला ख्रिसमस ट्री, टीव्हीवरील कलाकाराशी संवाद साधत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेत आहात, त्याचवेळी भरपूर बक्षिसांचा वर्षाव आपणावर होत आहे..

मनोरंजनाची पर्वणी ‘ख्रिसमस कार्निव्हल’
औरंगाबाद : ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मैदानात छान सजविलेला ख्रिसमस ट्री, टीव्हीवरील कलाकाराशी संवाद साधत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेत आहात, त्याचवेळी भरपूर बक्षिसांचा वर्षाव आपणावर होत आहे... अशा कल्पनेने आपण नक्कीच भारावून जाऊ. मात्र, शनिवार, दि.२० डिसेंबर रोजी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे ते लोकमत आणि युनिव्हर्सल हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ख्रिसमस कार्निव्हल २०१४’च्या माध्यमातून.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीजवळील युनिव्हर्सल हायस्कूलच्या मैदानात दुपारी ४ वा. मनोरंजन, धमाल, मस्तीला सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध टीव्ही स्टार सावधान इंडिया फाईटस् बॅक फेम गिरीश जैन व सीआयडीमधील ओळखीचा चेहरा टीव्ही स्टार वैभवी उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यात असणार आहे. टीव्ही स्टार मनोरंजन करीत सर्वांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय मुलांसाठी आकर्षक ठरेल ते क्वॉड कॉफ्टरचे- तांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत आविष्कार. या कार्निव्हलमध्ये सूर्यप्रकाशात आणि सूर्यास्तानंतर क्वॉड कॉप्टरचे तीन प्रयोग सादर केले जातील. या तांत्रिक करामतीची थोडीशी झलक ‘थ्री इडियट’ सिनेमामध्ये दाखविण्यात आली आहे. याद्वारे टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचा रस निर्माण करण्याचा उद्देश आहे. याशिवाय नाताळचा चविष्ट केक, लज्जतदार खाद्यपदार्थ, विविध खेळ आणि बक्षीस जिंकण्याची संधी, असा फूल टू धमाल कार्यक्रम यानिमित्ताने सर्वांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.