‘चटणी’फेम चोरांचा धुडगूस

By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:23:51+5:302015-02-03T00:59:42+5:30

बीड : डोळ्यात चटणीपूड टाकून पैशाच्या बॅगा हिसकावणाऱ्या चोरांनी शहरात सोमवारी रात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. एमआयडीसी व विप्रनगर भागात

'Chotni'fam thieves | ‘चटणी’फेम चोरांचा धुडगूस

‘चटणी’फेम चोरांचा धुडगूस


बीड : डोळ्यात चटणीपूड टाकून पैशाच्या बॅगा हिसकावणाऱ्या चोरांनी शहरात सोमवारी रात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. एमआयडीसी व विप्रनगर भागात अवघ्या दोन तासाच्या अंतराने घडलेल्या या घटनांनी पोलिसही हादरून गेले आहेत. चोरांनी व्यापाऱ्यांना टार्गेट केल्याने दहशत निर्माण झाली आहे.
जवाहर श्रीराम चरखा हे व्यापारी असून जुना मोंढा भागात त्यांचे पायल इंडस्ट्रिज नावाचे पेंडीचे दुकान आहे. शिवाय एमआयडीसी भागात त्यांची आॅइलमिल देखील आहे. मुनीम भरत राऊत याच्यासोबत ते दुचाकी क्र. (एम. एच. २३ एई- ७२११) वरुन जुन्या मोंढ्यातील दुकानावरुन एमआयडीसी भागातील आॅईलमिलकडे पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते.
त्यांची दुचाकी रामीतर्थ चौकातून आॅईल मिलजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केला. त्यानंतर चरखा यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. चरखा यांनी अशा स्थितीतही बॅग सोडली नाही. मात्र चोरांनी त्यांचा पाठलाग करून कोयत्याचा धाक दाखवत बॅग हिसकावली. मुनीम राऊत भयभीत झाला. त्याने आरडाओरड केली.
माकडटोप्यांचा केला वापर
ओळख लपविण्यासाठी चोरांनी माकडटोप्या घातल्या होत्या. बॅग चोरीचे काम फत्ते करून त्यांनी दोन मिनिटात धूम ठोकली.
अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक गौरव सिंह, सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत पेठ बीड ठाण्यात दोन्ही घटनांच्या संदर्भाने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)
एमआयडीसी भागात चरखा यांची बॅग पळविल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात छाया ट्रेडर्स या किराणा दुकानाचे मालक प्रेमचंद संचेती यांच्यावरही असाच प्रसंग रात्री साडेनऊ वाजता विप्रनगर भागात बेतला.
४मुनीम सचिन यादव याच्यासमवेत संचेती दुचाकी (क्रमांक एमएच २३/५२९७) वरून दिवसभर केलेल्या व्यवसायाची रक्कम बॅगेत घेऊन घरी जात होते. पुलावर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. डोळ्यात चटणी फेकून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. संचेतींनी विरोध केला.
४झटापटीत त्यांच्या हातावर जखम झाली. मात्र रक्कम वाचली.
४चरखा प्रकरणात पोलिस गुंतलेले असताना विप्रनगरात ही घटना घडली.

Web Title: 'Chotni'fam thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.